फलटणकरांनी आमच्या मतदारसंघात लुडबूड करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2016 10:15 PM2016-06-27T22:15:48+5:302016-06-28T00:33:00+5:30

जयकुमार गोरे : येलमरवाडीत विविध विकासकामांचे उद्घाटन

Phaltankar should not interfere in our constituency | फलटणकरांनी आमच्या मतदारसंघात लुडबूड करू नये

फलटणकरांनी आमच्या मतदारसंघात लुडबूड करू नये

Next

कातरखटाव : ‘गावचा सरपंच असो, अथवा तालुक्याचा आमदार. विकासकामे दिसून येत नसतील तर जनतेने त्यांना घरी बसवलं पाहिजे. स्वाभिमानाने जगण्यासाठी माण-खटावचा विकास झाला पाहिजे. काही नेत्यांनी फक्त दुष्काळ हटला पाहिजे, पाणी प्रश्न मिटला पाहिजे, या आश्वासनांशिवाय या भागात काहीही दिलं नाही. पंचवीस वर्षांत विरोधकांनी काय दिवे लावले. फलटणच्या लोकांनी आमच्या मतदारसंघात लुडबुड करू नये. हिम्मत असेल तर विकासकामांचे बोला.’ अशी खरमरीत टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केली.
खटाव तालुक्यातील येलमरवाडी येथे सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांच्या सत्कार, पुलाजवळील सिंमेट बंधारा, नवीन ग्रामपंचायत कार्यालय, शिंगाडे वस्ती पाईपलाईन, तळेकर वस्ती पाईपलाईन यासह विविध कामांच्या उद्घाटप्रसंगी ते बोलत होते.
आ. गोरे म्हणाले, ‘यलमरवाडी गावच्या विकासात युवा पिढीचं योगदान दिसून येत आहे. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत एकाही आमदाराला गावचा रस्ता करता आला नाही. गावात साधी एसटी बस सुद्धा आणता आली नाही; परंतु आज येथील युवकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे येलमरवाडी गावचा कायापालट होत चालला आहे. संपूर्ण अडगळीच्या रस्त्यांचे डांबरीकरण होत चालले आहे. माण-खटाव तालुक्यांतील प्रत्येक गावचा कारभारी चांगला पाहिजे. मग तो सरपंच असो, वा आमदार. विकासकामाकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना घरी बसवा.
कार्यक्रमास निमसोडचे काकासो मोरे, रामभाऊ देवकर-पाटील, राजू निकम, विशाल बागल, सरपंच प्रसाद बागल, उपसरपंच नवनाथ शिंगाडे, तात्यासो शिंगाडे, सोसायटी अध्यक्ष विजय बागल, उपाध्यक्ष दत्ता केंगार, संचालक वसंतराव बागल, मधुकर तळेकर, सुमल बागल, सुरेश बागल, हणमंत बागल, भरत बागल, विठ्ठल बागल आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसाद बागल यांनी सूत्रसंचालन केले. दादासो बागल यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Phaltankar should not interfere in our constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.