लेवेंच्या मिरवणुकीत उदयनराजेंचे छायाचित्र

By Admin | Published: October 27, 2016 11:19 PM2016-10-27T23:19:35+5:302016-10-27T23:19:35+5:30

बनकरांच्या वॉर्डात माळवदेंचा अर्ज : ‘साविआ’च्या पदाधिकाऱ्यांसह ३० जणांनी भरले उमेदवारी अर्ज

Photo of Udayanaraja in Levant's procession | लेवेंच्या मिरवणुकीत उदयनराजेंचे छायाचित्र

लेवेंच्या मिरवणुकीत उदयनराजेंचे छायाचित्र

googlenewsNext

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगरविकास आघाडीच्या इच्छुकांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. आघाडीच्या ४० उमेदवारांची यादी तयार झाली असल्याने हे सर्व अर्ज आज, शुक्रवारी भरण्यात येणार आहेत. नगरविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी ‘लोकमत’ने यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे कर्तव्य सोशल गु्रपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले राजकारणात सक्रीय होणार असून, नगराध्यक्षपदासाठीचा त्यांचा उमेदवारी अर्ज उद्या, शनिवारी दाखल केला जाणार आहे.
सातारा विकास आघाडीतून नगराध्यक्षपदासह उमेदवारी देण्याबाबत ‘सस्पेंस’ कायम ठेवला असला तरी गुरुवारी दाखल केलेल्यांमध्ये अर्जांमध्ये सातारा विकास आघाडीकडून लढणाऱ्यांची संख्या मोठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. माजी नगराध्यक्षा मुक्ता लेवे यांचे पती व माजी नगरसेवक वसंत लेवे यांनी सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांची ‘साविआ’ची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पालिकेच्या बाहेर जोरदार आतषबाजीही करण्यात आली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोन्ही आघाड्यांचे मनोमिलन व्हावे, यासाठी हात पुढे केला होता. त्यांनी यासाठी दिलेली मुदतही संपली असल्याने नगरविकास आघाडीकडून वेदांतिकाराजेंचे नाव नगराध्यक्षपदासाठी अंतिम करण्यात आले. पालिकेत दहा वर्षे एकत्रित सत्तेत असणाऱ्या सातारा विकास व नगरविकास या दोन्ही आघाड्यांनी सवता सुभा थाटण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती बुधवारी पुढे आली आहे. मनोमिलनातील या दोन्ही आघाड्या मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार झाल्या आहेत.
गुरुवारी सायंकाळी दोन्ही आघाड्यांचे एकमत झाल्याच्या वावड्या उठल्या होत्या, याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी याबाबतच्या चर्चा खोट्या असल्याचे सांगितले. मैत्रीसाठी हात पुढे केला होता; परंतु समोरून काहीच प्रत्युत्तर येत नसेल तर आपल्यापुढे पर्यायच उरला नसल्याचेही शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
काँगे्रसतर्फे धनश्री महाडिक
काँगे्रसच्या वतीने प्रथमच सातारा पालिकेची निवडणूक लढविण्यात येत आहे. काँगे्रसच्या महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्चित केले गेले आहे. काँगे्रसच्या वतीने जवळपास दहा उमेदवार निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकांमध्ये काँगे्रसचे उमेदवार सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून लढले होते. ‘साविआ’मध्ये दोन जागा काँगे्रसच्या वाट्याला ठेवण्यात येत होत्या; काँगे्रसचे शहराध्यक्ष रवींद्र झुटिंग व सीता हादगे हे दोन नगरसेवक काँग्रेसचे होते; परंतु या निवडणुकीत प्रदेश पातळीवरूनच काँगे्रसने राज्यभर सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याने काँगे्रस सातारा पालिकेत पॅनेल टाकणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आले.
 

Web Title: Photo of Udayanaraja in Levant's procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.