हौशी छायाचित्रकारांचे कासवर ‘फोटो वॉक’
By admin | Published: October 28, 2014 11:52 PM2014-10-28T23:52:30+5:302014-10-29T00:09:48+5:30
शंभरहून अधिक सहभागी : निसर्गाच्या सानिध्यात छायाचित्रणाचा घेतला आनंद
सातारा : ‘प्लॅटू आॅफ फ्लावर्स’ म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर शंभरहून अधिक हौशी छायाचित्रकारांनी फोटो वॉकचा आनंद लुटला. ‘शेडस आॅफ सातारा’ या संस्थेने या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. निसर्गाच्या सानिध्यात छायाचित्रणाचा आनंद अशी यामागील मुख्य संकल्पना होती.
हौसी, व्यवसायिक छायाचित्रकारांनी निसर्गाच्या जवळ यावे आणि निसर्गाच्या सानिध्यात छायाचित्रणाचा आनंद लुटावा या अनुषंगाने ‘शेडस आॅफ सातारा’ या संस्थेने कास येथे ‘फोटो वॉक’चे आयोजन केले होते. संस्थेने आवाहन केल्यानंतर सातारा तसेच आजूबाजूच्या परिसरातून आणि पुणे, मुंबई येथून शंभरहून अधिक हौशी छायाचित्रकार सहभागी झाले होते. कास पठार ते कुमुदिनी लेक असा हा प्रवास झाला. त्यामुळे सहभागींना कास पठरावरील विविध प्रजातींची फुले, वनस्पती, पक्षी, कीटक यांची माहितीही मिळाली. विशेष म्हणजे यावेळी परिसर स्वच्छ करण्यातही हौशी छायाचित्रकारांनी भूमिका बजावली.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आशिष लंगडे, निखील गोरे, आदित्य भोसले, अभिषेक गोरे, अभिजित मतकर, गौरव मोहिरे ‘शेडस आॅफ सातारा’च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न
केले. (प्रतिनिधी)