रहिमतपूर-औंध रस्त्यावर पिकअप उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:48+5:302021-07-12T04:24:48+5:30

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावर साप फाटा येथे दुभाजकाला धडकून पपईची वाहतूक करणारी पिकअप गाडी उलटली. या अपघातात ...

Pickup overturned on Rahimatpur-Aundh road | रहिमतपूर-औंध रस्त्यावर पिकअप उलटली

रहिमतपूर-औंध रस्त्यावर पिकअप उलटली

googlenewsNext

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावर साप फाटा येथे दुभाजकाला धडकून पपईची वाहतूक करणारी पिकअप गाडी उलटली. या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले असून, सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये गाडीचालक व मालक महावीर संपत केसकर (रा. पंढरपूर) व एक सहकारी यांचा समावेश आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी पिकअप गाडी (एमएच ४५ एएफ ४१६५) मध्ये सांगली येथे पपई भरली होती व मुंबई मार्केटला घेऊन निघाले होते. दरम्यान, रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास औंधकडून साताऱ्याला जात असताना पिकअप रहिमतपूरजवळील साप फाटा येथील सातारा-विटा या राज्यमार्गावरील दुभाजकाला धडकून तब्बल साठ फुटांपेक्षा जास्त अंतरावर रस्त्याला घासत जाऊन उलट दिशेला तोंड करून उलटली. दुभाजकाला बसलेली धडक एवढी भीषण होती की, यामध्ये दुभाजक पूर्णपणे फुटले आहे. गाडीचा एक टायरही फुटला असून, गाडीचे नुकसानही झाले आहे. गाडीतील पपई रस्त्यावर अस्ताव्यस्त पडून त्याचा खच पडला होता. दैव बलवत्तर म्हणूनच या अपघातात गाडी चालकासह शेजारी बसलेला एकजण असे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने पडलेली पिकअप गाडी उचलून रस्ता वाहतुकीस रिकामा करण्यात आला. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सची लाईट अचानक डोळ्यांवर पडल्यामुळे अपघात झाल्याची माहिती वाहनचालक महावीर केसकर यांनी दिली.

(चौकट)

पाच वाहने उलटली अन् दोघांचा मृत्यू

सातारा-विटा या राज्यमार्गावर रहिमतपूर-पिंपरी फाटा या दरम्यानच्या रस्त्यावर गेल्या चार महिन्यांत पाच वाहने उलटली आहेत. यामधील तीन वाहने साप फाटा येथील दुभाजकाला धडकून उलटली आहेत, तर तेथूनच औंध बाजूला काही अंतरावर एक कार चरीमध्ये पडली होती. तेथूनच पुढे काही अंतरावरील कालव्याच्या शेजारी जनावरांचे खाद्य मका घेऊन निघालेला टेम्पो उलटला होता. या अपघातात समोरून येणाऱ्या दुचाकीचालकाचा मृत्यू झाला होता, तर गेल्या चार दिवसांपूर्वीच पिंपरी फाटा येथे दुचाकीवरून रस्ता ओलांडताना एका दुचाकी चालकाला दुसऱ्या दुचाकी चालकाची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू झाला होता. साप फाटा येथील दुभाजकाला वारंवार वाहने धडकत असल्यामुळे या ठिकाणी गाड्यांचा वेग कमी व्हावा, या दृष्टीने बांधकाम विभागाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांतून होत आहे.

११रहिमतपूर

फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील साप फाटा येथे दुभाजकाला धडकून पिकअप गाडी उलटल्याने पपईचा रस्त्यावर खच पडला आहे. (छाया : जयदीप जाधव)

Web Title: Pickup overturned on Rahimatpur-Aundh road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.