गोकाक योजनेची पाईप लोकवस्तीत फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:40 AM2021-03-26T04:40:11+5:302021-03-26T04:40:11+5:30

कापिल, गोळेश्वर, क-हाड व मलकापूर या गावातील शेतक-यांनी एकत्र येऊन शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी गोकाक या सहकारी संस्थेची स्थापना ...

The pipe of the Gokak scheme burst in the population | गोकाक योजनेची पाईप लोकवस्तीत फुटली

गोकाक योजनेची पाईप लोकवस्तीत फुटली

Next

कापिल, गोळेश्वर, क-हाड व मलकापूर या गावातील शेतक-यांनी एकत्र येऊन शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी गोकाक या सहकारी संस्थेची स्थापना केली. महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजूस कोयना नदीवरून या योजनेचा पाणी उपसा केला जातो. १७५ अश्वशक्ती क्षमतेच्या विद्युत पंपाद्वारे ३६ इंची पाईपलाईनद्वारे मुख्य कार्यालयापर्यंत पाणी उचलले जाते. तेथून वेगवेगळ्या मार्गाने वितरण व्यवस्थेच्या पाईपलाईनमधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. ही पाईपलाईन पूर्वी मोकळ्या शेतातून केली होती. हळूहळू या पाईपलाईनच्या दुतर्फा सिमेंटचे जंगल तयार होत गेले.

मलकापुरातील शास्त्रीनगर पश्चिम व पूर्व या लोकवस्तीमधून गेलेल्या पाईपलाईन सभोवती घरांची गर्दी झाली आहे. गुरुवारी दुपारी अचानक येथील पादचारी पुलाजवळ महामार्गाच्या पूर्वेला मुख्य पाईपलाईन फुटली. घरांच्या गर्दीतून गेलेली पाईप आचानक फुटून काही कळण्यापूर्वीच हॉटेल दिवारसह काही दुकानात पाणी घुसून नुकसान झाले. तर उपमार्गावर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाहत असल्यामुळे पाणीच पाणी झाले होते.

उपमार्गावरून ये जा करणा-या वाहनधारकांना पाऊस नसताना अचानक पुरस्थितीचा अनुभव आला. जर पूर्ण क्षमतेने १७५ अश्वशक्तीच्या तीन विद्युत पंपाने पाणी उपसा सुरू असताना अशी दुर्घटना झाली असती तर आसपासच्या घरांसह व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.

- चौकट

इमारतींना धोक्याची घंटा

गोकाक पाणी पुरवठा योजनेच्या या मुख्य पाईपलाईनला अनेक वर्षे झाली आहेत. पूर्वी पाईपलाईन करताना एकही घर नव्हते. एवढ्या मोठ्या पाईपलाईनच्या दुतर्फा कोणताही अनर्थ होऊ नये म्हणून किमान २० फूट जागा रिकामी सोडणे बंधनकारक आहे. मात्र केवळ दहा फुटाचे अंतर सोडून अनेक इमारती झाल्या आहेत. काही ठिकाणी तर घासून तर काही ठिकाणी पाईपलाईनवरच अतिक्रमण झालेले आहे. अशा पाईपलाईन लगतच्या इमारतींना आजच्या दुर्घटनेने धोक्याची घंटाच दिली आहे.

- कोट

५२५ अश्वशक्तीने पाणी उपसा झालेले पाणी वाहून नेण्यासाठी ३६ इंच व्यासाची तीन किलोमीटर पाईपलाईन आहे. पूर्वी शेती होती. आता या परिसरात सिमेंटचे जंगल झाले आहे. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी संस्थेने ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह काढलेले आहेत. गेली ११ वर्षात पहिल्यांदाच ही घटना घडली आहे. पाईपलाईनच्या दुतर्फा असलेल्या मिळकतदारांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

- सुरेश जाधव

सहायक सचिव, गोकाक पाणी पुरवठा योजना

फोटो : २५ केआरडी०७

कॅप्शन : मलकापूर-शास्त्रीनगर येथे गोकाक योजनेची पाईप फुटल्याने उपमार्ग जलमय झाला होता. (छाया : माणिक डोंगरे)

Web Title: The pipe of the Gokak scheme burst in the population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.