रस्ता नसल्याने ग्रामस्थांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:27+5:302021-06-03T04:27:27+5:30

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात आजही रस्त्यांविना ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. महाबळेश्वर हा दुर्गम तालुका असल्याने आजही ...

Pipeline of villagers as there is no road | रस्ता नसल्याने ग्रामस्थांची पायपीट

रस्ता नसल्याने ग्रामस्थांची पायपीट

Next

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात आजही रस्त्यांविना ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. महाबळेश्वर हा दुर्गम तालुका असल्याने आजही अनेक गावे रस्त्यापासून वंचित आहेत. डोंगर, जंगल क्षेत्रात अनेक गावे असल्यामुळे येथे दळणवळण तसेच इतर सुविधांची कमतरता जाणवते. याठिकाणी शासनाकडून अत्यावश्यक सेवा पुरविल्या जात नसल्याने याचा ग्रामस्थ व शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

जलवाहिनीला गळती; पाण्याचा अपव्यव

सातारा : सदर बझार, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व गोडोली आदी भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. जीवन प्राधिकरणकडून गळती काढण्याचे काम तातडीने केले जाते; परंतु बऱ्याचदा अवजड वाहनांमुुळे जलवाहिनी फुटण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. जीवन प्राधिकरणने गळतीचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

आंबेनळी घाटातील कठड्यांची दुरवस्था

महाबळेश्वर : महाबळेश्वर - पोलादूपर मार्गावरील आंबेनळी घाटात अनेक ठिकाणी सरंक्षक कठडे नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी वाहनचालकांना अनेक अडचणी येत आहेत. पावसामुळे या घाटात अनेकदा दरडी कोसळल्या असून, संरक्षक कठड्यांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक नसल्याचे पर्यटक व वाहनधारकांची नेहमीच फसगत होते. बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

सदर बझार येथे डुकरांचा सुळसुळाट

सातारा : शहरातील सदर बझार परिसरात डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट डुकरांच्या उपद्रवाबाबत पालिकेत तक्रारी दाखल झाल्या होत्या. याची दखल घेत पालिकेने वराह पालन करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मोकाट डुकरे पकडली होती. मात्र, ही मोहीम थंडावल्याने सदर बझार, माची पेठ परिसरात डुकरांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. पालिकेने पुन्हा एकदा ही मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Pipeline of villagers as there is no road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.