कृष्णा पुलावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:47+5:302021-07-19T04:24:47+5:30
बाजारपेठेत गर्दी कऱ्हाड : शहरातील मुख्य बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकानदारांना व्यवसाय करण्यास मनाई आहे. मात्र, तरीही ...
बाजारपेठेत गर्दी
कऱ्हाड : शहरातील मुख्य बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकानदारांना व्यवसाय करण्यास मनाई आहे. मात्र, तरीही अनेक व्यावसायिक छुप्या पद्धतीने मालाची खरेदी-विक्री करीत असून त्यामुळे गर्दी वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापही कडक निर्बंध घालून दिले आहेत. मात्र, अनेक जण निर्बंध झुगारून व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.
कृष्णा पुलावर खड्डे
कऱ्हाड : येथील नवीन कृष्णा पुलावर रस्ता उखडला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात डांबर निघून गेले असून खडी पसरण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. कामाच्या दर्जाबाबत वाहनधारकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पाडळीत लसीकरण
कऱ्हाड : पाडळी-केसे, ता. कऱ्हाड येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी सरपंच आशामा मुजावर, उपसरपंच सलीम मुजावर, आनंदा बडेकर, नय्युम शेख, तलाठी विशाल बाबर, सर्फराज शेख, कांताबाई मोहिते, गोरखनाथ कोळी यांच्यासह सुपने आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या मोहिमेस ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.