मेढा - पाचवड रस्त्यावरील खड्डे बुजविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:07+5:302021-07-11T04:26:07+5:30

कुडाळ : राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मेढा - पाचवड हा मार्ग जावळी तालुक्यातील पश्चिम भागातील लोकांना मुंबई, पुणे ...

Pits on Medha-Pachwad road filled! | मेढा - पाचवड रस्त्यावरील खड्डे बुजविले!

मेढा - पाचवड रस्त्यावरील खड्डे बुजविले!

Next

कुडाळ : राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मेढा - पाचवड हा मार्ग जावळी तालुक्यातील पश्चिम भागातील लोकांना मुंबई, पुणे या शहरांत जाण्यासाठी नजीकचा झालेला आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. ‘राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मेढा - पाचवड रस्त्याची दुरवस्था’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याचा परिणाम म्हणून बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. यामुळे वाहनचालक व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

म्हसवे फाटा ते बोराटे वस्ती तसेच कुडाळपासून दरे बुद्रुक दरम्यानचा रस्ता खड्डेमय झाला होता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बांधकाम विभागाने या रस्त्यावरील मोठे खड्डे बुजवले आहेत. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा मुख्य रस्ता कायमच रहदारीचा असतो. दिवसभर या मार्गावर वाहतूक सुरू असते. रस्त्यावर खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अजूनही काही ठिकाणी लहान खड्डे तसेच डबडेवाडी, सोनगाव फाटा या दरम्यान रस्त्याचा खचलेला भाग भरण्याचे काम बाकी आहे. खड्डे बुजवले तसा उर्वरित लहान खड्डे व रस्त्याचा खचलेला भागही लवकर भरावा, अशी नागरिक व वाहनचालकांची मागणी आहे.

कोट:

बांधकाम विभागाने सरताळे-कुडाळ हद्दीत व पुढे दरे बुद्रुक गावापर्यंत मेढा रस्त्यावर असणारे मोठमोठे खड्डे बुजवले आहेत. या रस्त्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. सद्यस्थितीत काही ठिकाणी खचलेल्या रस्त्यावर भरावाची गरज आहे. तसेच लहान-लहान खड्डे भरण्याचीही आवश्यकता आहे. याबाबत समस्या मांडल्यानंतर बांधकाम विभागाने दखल घेत रस्त्यावरील मोठे खड्डे बुजवले आहेत.

- कृष्णात मोरे, जिल्हाध्यक्ष, वंचित आघाडी (गवई गट)

१० कुडाळ

फोटो: जावळी तालुक्यातील कुडाळ - मेढा रस्त्यावर ठिकठिकाणी असणारे मोठे खड्डे बुजवले आहेत. (छाया : विशाल जमदाडे)

Web Title: Pits on Medha-Pachwad road filled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.