स्थानिकांना काम तरच टोलनाक्याला जागा
By admin | Published: June 25, 2015 10:43 PM2015-06-25T22:43:54+5:302015-06-25T22:43:54+5:30
आनेवाडी ग्रामस्थांचा विरोध : जमिनी भाडेपट्ट्यावर घेऊन मुलांना कायमस्वरुपी काम देण्याची शिवेंद्रसिंहराजेंकडून मागणी
सातारा : राधिका रस्त्यावरील भोसले मळ्याला लागून असलेल्या आयोध्यानगरी वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे. या रस्त्यामध्ये पाणी साचले असून, परिसरात राहणारे वृद्ध व लहान मुलांचे आतोनात हाल होत आहेत. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त न झाल्याने अयोध्यानगरीवर ही परिस्थिती ओढावली आहे.
काही वर्षांपूर्वी भोसले मळ्याच्या परिसरामध्ये अयोध्यानगरी वसाहात वसविण्यात आली आहे. या ठिकाणी बहुतांश उच्चभू्र लोक वास्तव्य करत आहेत. तसेच शासकीय अधिकारीही आहेत. पावसाळ्यापूर्वी येथील लोकांनी पुढाकार घेऊन रस्ता तयार केला; मात्र प्रशासनाकडून त्यांना कसलीच मदत मिळाली नाही. सध्या असणारा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे रहदारीलाही मोठी अडचण होत आहे. त्यातच रस्त्याच्या शेजारी गटार आणि शेत आहे. गटारातील पाणी तुंबत असल्यामुळे शेतात आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी साचत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने काही वेळेला वसाहतीपर्यंत पाण्याचे लोट जात आहेत. या रस्त्यावरून चारचाकीमधून जाताना फारशी अडचण येत नाही; परंतु पादचारी नागरिकांना गुडघ्याभर पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. तर दुचाकीस्वारांना मात्र सर्कस करत जावे लागत आहे.
शाळेला जाणाऱ्या लहान मुलांना या पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यात पाणी साचल्यामुळे पाण्यातून चालताना अंदाज येत नाही.
रस्त्यामध्ये छोटे-मोठे खड्डे पडल्यामुळे पाय मुरगळण्याचे प्रकारही घडत आहेत.
वसाहतीच्या बाहेरच्या बाजूस अरुंद नाला आहे. हा नालाही पावसाच्या पाण्यामुळे तुंबत असून, हे पाणी वसाहतीमध्ये शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन येथील रहिवाशांची होणारी परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
पाण्यात पडल्याने शाळेला दांडी !
काही दिवसांपूर्वी या वसाहतीमध्ये राहणारे एक पालक आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. पाणी साचलेल्या ठिकाणाहून वाट काढत हळूहळू ते जात होते. मात्र अचानक दुचाकी दगडावरून घसरली. त्यामुळे छोटा मुलगा आणि वडीलही पाण्यात पडले; मात्र सुदैवाने दोघांनाही दुखापत झाली नाही. त्या दिवशी त्या मुलाला शाळेत जाता आले नाही. अशा प्रकारचे वारंवार प्रकार घडत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
या रस्त्याच्या मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान’ या योजनेतून या रस्त्याचे काम होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याची मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने या वसाहतीच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे.
-दिलीप चिद्रे,
नगर अभियंता, सातारा पालिका
या ठिकाणी सगळ्या चांगल्या सोयी असल्या तरी दळणवळणाची सोय चांगली नाही. रात्रीच्या सुमारास येथून चालत जाताना अंगावर काटा येतो. रस्त्यात पाणी साचल्यामुळे रस्ता नेमका कुठे आहे, हे दिसत नाही. पालिका प्रशासनाने आमची तातडीने दखल घेऊन रस्त्यातील पाणी काढावे.
- संजय जगताप, रहिवासी