शिवप्रताप दिन उत्सवासाठी सूक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 01:00 PM2024-12-03T13:00:30+5:302024-12-03T13:00:51+5:30

सातारा : किल्ले प्रतापगड येथे रविवार दि. ८ रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे. याचे सर्व विभागांनी ...

Plan meticulously for Shiv Pratap Day celebrations at Fort Pratapgad Instructions given by District Collector of Satara | शिवप्रताप दिन उत्सवासाठी सूक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी

शिवप्रताप दिन उत्सवासाठी सूक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी

सातारा : किल्ले प्रतापगड येथे रविवार दि. ८ रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे. याचे सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्याबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे-पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठीच्या आराखड्याचे थ्रीडी मॉडेल तयार करावे. त्याचबरोबर किल्ल्याची माहितीही याबरोबर देण्यात यावी. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामांच्या माध्यमातून प्रतापगड परिसरात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती पर्यटकांना देण्यात यावी. किल्ले प्रतापगडावर गडावर विद्युत रोषणाई करावी, अशा सूचना करून जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, किल्ले प्रतापगडाची संपूर्ण स्वच्छता करावी. ऐतिहासिक मर्दानी खेळांचे, पोवाड्यांचे आयोजन करावे.

त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी एसटी महामंडळाने बसेसची सोय करावी. त्याच बरोबर येणाऱ्या पर्यटकांसाठी अल्पोपाहाराचीही व्यवस्था करावी. शिवप्रताप दिनाचे नियोजन करत असताना विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Web Title: Plan meticulously for Shiv Pratap Day celebrations at Fort Pratapgad Instructions given by District Collector of Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.