डाेस वाया जाऊ नये म्हणून दहाजणांचे नियोजन सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:39 AM2021-01-23T04:39:15+5:302021-01-23T04:39:15+5:30

सातारा : लसीची बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. अन्यथा डोस वाया जाण्याची शक्यता असते. परंतु अशाप्रकारे ...

The planning of tens is mandatory so that the dais is not wasted | डाेस वाया जाऊ नये म्हणून दहाजणांचे नियोजन सक्तीचे

डाेस वाया जाऊ नये म्हणून दहाजणांचे नियोजन सक्तीचे

googlenewsNext

सातारा : लसीची बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. अन्यथा डोस वाया जाण्याची शक्यता असते. परंतु अशाप्रकारे डोस वाया जाऊ नये म्हणून आरोग्य विभाग दहा जणांचे नियोजन करून त्यांना लस देत आहे. त्यामुळे बाटलीमध्ये लस उरत नसल्यामुळे वाया तर जात नाहीच शिवाय लस भरतानाही ती वाय जाऊ नये, अशी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे अद्यापर्यंत जिल्ह्यात लस वाया गेली नसल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात पहिल्या दिवशी ९०० जणांना लस देण्यात आली. काहीजणांना वेळेअभावी लस देता आली नाही. अशा लोकांना दुसऱ्या दिवशी लस देण्यात आली. लस वाय जाऊ नये म्हणून दहा-दहा जणांचा ग्रुप तयार करण्यात आलाय. त्यानंतर एकाला जरी लस द्यायची असेल तर मग दुसऱ्या दिवशी त्याला बोलावले जाते. जेणेकरून लस वाया जाऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. लाभार्थ्याला मेसेज जाण्यासाठी तांत्रिक बिघाड होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एका बाटलीत १० डोस

लसीच्या एका बाटलीतून दहा जणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते तसेच डोस भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डाेस वेस्टेज जातात.

घाबरू नका

लस दिल्यानंतर किरकोळ ताप येणे, उलट्या मळमळ असे प्रकार होत असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. लसची रिॲक्शन होत नाही. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्त रहावे.

गत काही दिवसांपासून जवळपास १२००० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आलीय. एकाही कर्मचाऱ्याला त्रास झाला नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन डाॅ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: The planning of tens is mandatory so that the dais is not wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.