दिंंडीतील वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

By admin | Published: June 20, 2017 04:30 PM2017-06-20T16:30:54+5:302017-06-20T16:30:54+5:30

किसन वीर कारखान्याची अभिनव परंपरा

Plantation at the hands of Warkaris in Dinindi | दिंंडीतील वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

दिंंडीतील वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

Next


आॅनलाईन लोकमत

भुर्इंज (सातारा ) , दि. २0 : सावळ्या विठोबाच्या भेटीसाठी निघालेल्या कारखाना परिसरातील वारकऱ्यांच्या हस्ते किसन वीर कारखान्याने वृक्ष लागवड करून वृक्षारोपण करण्याची अभिनव परंपरा जपली आहे.

आषाढी वारीसाठी पुनर्वसित भिवडी (ता. वाई) येथून निघालेल्या सद्गुरू जोगङ्कमहाराज प्रासादिक दिंडीतील वारकऱ्यांच्या हस्ते आणि कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर व संचालक मंडळाच्या पमुख उपस्थितीत गाडीतळ परिसरात राज्यवृक्षाचा दर्जा मिळालेल्या तामण जातीच्या वृक्षाचे रोपण जगद्गुरू तुकोबारायांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे... या अभंगाच्या गजरात करण्यात आले.

टाळ, मृदंग, ग्यानबा तुकाराम आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरेच्या गजरात वृक्षारोपण झाल्यानंतर या दिंंडीने पुढे प्रस्थान केले.

यावेळी प्रमोद गावडे, निलेश धुरी, कारखान्याचे संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंंह शिंंदे, नंदकुमार निकम, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रविण जगताप,मधुकर शिंंदे, चंद्रसेन शिंंदे, प्रकाश पवार-पाटील, मधुकर नलवडे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Plantation at the hands of Warkaris in Dinindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.