निसर्गाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:20+5:302021-07-01T04:26:20+5:30
रामापूर : ‘निसगाने मानवास भरभरून दिले आहे आणि देत आहे. माणूस निसर्गाला ओरबाडण्याचे काम करीत आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाला ...
रामापूर : ‘निसगाने मानवास भरभरून दिले आहे आणि देत आहे. माणूस निसर्गाला ओरबाडण्याचे काम करीत आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाला ऑक्सिजनचे महत्त्व पटले आहे. वृक्ष आपणास ऑक्सिजन देतात. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन लोकचळवळ व्हावी. निसर्ग संवर्धनासाठी व संतुलनासाठी वृक्षारोपण आता काळाची गरज आहे. स्वयंस्फूर्तीने सामाजिक संस्था, गणेश मंडळे यांच्यावतीने मोकळ्या जागेत वृक्षारोपण केले पाहिजे. ‘माझे झाड माझी जबाबदारी’ उपक्रमातून वृक्षसंवर्धन व्हावे,’ असे प्रतिपादन आधार जनसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले.
पाटण तालुक्यातील येरफळे येथील स्मशानभूमीत वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सदस्य लक्ष्मण पाटील यांनी विविध प्रकारची झाडे लावली. गतवर्षी रक्षाविसर्जनादिवशी वड, पिंपळ, बेल, गुलमोहर, करंज, जांभूळ, रेनट्री, काशिद, कांचन अशी विविध झाडे लावून व संरक्षक जाळ्या बसवून ती जगवण्यात आली. वृक्षारोपणासाठी लक्ष्मण पाटील, सोमनाथ आग्रे, शेखर धामणकर, राहुल कदम, सोमनाथ जंगम, रथिन आग्रे, बाळकृष्ण पाटील, सचिन पाटील, प्रथमेश पुजारी, श्रेयश पाटील, प्रल्हाद पाटील, पोपट पाटील, आराध्या पाटील आदींनी परिश्रम घेतले.