खटाव येथे शहाजीराजे महविद्यालय परिसरात वृक्षारोपण
By Admin | Published: July 10, 2017 02:39 PM2017-07-10T14:39:20+5:302017-07-10T14:39:20+5:30
वृक्षारोपणानंतर त्याचे जगवण्यासाठी पालकत्व घ्यावे : पाटील
आॅनलाईन लोकमत
खटाव (जि. सातारा), दि. १0 : पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी शासन कार्यक्रम राबवते म्हणून काम करू नका तर त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी मनापासून करा. वृक्षारोपण केले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही, तर ते लावलेले रोप वाचवण्याची व जगवण्याचीही जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य संजय पाटील यांनी केले.
खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महविद्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. आर. के साखरे, एनएसएस विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोदिनी कांबळे, प्रा. आर. बी. पवार,. प्रा. एस. एन. खाडे, तसेच एनएसएस विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वृक्षारोपणावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या झाडाचे पालकत्व स्वीकारून ते जगवण्याची शपथ घेतली.