दोन वर्षांपासून वृक्षारोपण मंदावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:25 AM2021-06-28T04:25:50+5:302021-06-28T04:25:50+5:30

कोपर्डे हवेली : गत दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याने त्याचा परिणाम वृक्षारोपणावर झाल्याचे दिसत आहे. ...

Plantation slowed down for two years! | दोन वर्षांपासून वृक्षारोपण मंदावले !

दोन वर्षांपासून वृक्षारोपण मंदावले !

Next

कोपर्डे हवेली : गत दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याने त्याचा परिणाम वृक्षारोपणावर झाल्याचे दिसत आहे.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनाबरोबर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असते. पावसाळ्यात हे वृक्षारोपण केले जाते. वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येत असते.

यामध्ये सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये, कृषी विभाग, ग्रामपंचायत, नगरपालिका आदींसह इतर घटक आघाडीवर असतात. फळझाडे लागवडीसाठी कृषी विभाग अनुदान देतो.

गेल्या वर्षी आणि या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाचे वृक्षारोपणाचे प्रयत्न तोकडे पडत आहे. अपवाद आहे तो फळझाडे लागवडीचा. ते करण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.

गेल्या काही वर्षांत ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत होते. त्याला कोरोनामुळे दोन वर्षांत मर्यादा आल्या आहेत. शाळा बंद आहेत. तर इतर संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात गुंतल्या आहेत. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून वृक्षारोपणाचा वेग मंदावला आहे.

Web Title: Plantation slowed down for two years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.