पाठरवाडीच्या डोंगरात शंभरवर रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:41 AM2021-08-23T04:41:11+5:302021-08-23T04:41:11+5:30
कऱ्हाड : तांबवे (ता. कऱ्हाड) येथील शहीद जवान युवराज पाटील प्रतिष्ठानच्यावतीने पाठरवाडीच्या भैरोबा डोंगरावर चिंच, जांभूळ, सीताफळ, पिंपळ, गुलमोहर ...
कऱ्हाड : तांबवे (ता. कऱ्हाड) येथील शहीद जवान युवराज पाटील प्रतिष्ठानच्यावतीने पाठरवाडीच्या भैरोबा डोंगरावर चिंच, जांभूळ, सीताफळ, पिंपळ, गुलमोहर आदी १०० रोपांचे रोपण करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, वन अधिकारी मंगेश वंजारे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. गमेवाडीचे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, पाठरवाडीचे पोलीस पाटील सागर यादव, उत्तर तांबवेचे पोलीस पाटील शशिकांत चव्हाण, शिवाजी पाटील, संतोष पाटील, वैभव शिंदे, हर्षल पाटील, विनायक पाटील यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत पाटील यांनी स्वागत केले. सुजय पाटील यांनी आभार मानले. या उपक्रमाला गमेवाडी ग्रामपंचायत, वन विभागाने सहकार्य केले.
पाटण तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मदत
कऱ्हाड : पाटण तालुक्यातील चाफोली, अरल, धारेश्वर दिवशी, कुसवडे, टोळीवाडी, बोंदरी, गोजेगाव, जायचीवाडी, गावडेवाडी व पाटण शहर येथील पूरग्रस्तांना आमदार सुनील शेळके आणि आम्ही देहूकर परिवाराच्यावतीने मदत देण्यात आली. यावेळी देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश हगवणे, योगेश जाधव, अमित घेनंद, शैलेश चव्हाण, माणिक जाधव, येराडवाडीचे सरपंच सुधाकर देसाई, संदीप देसाई, जितेंद्र मोळवडे, सुहास गव्हाणे, अजित थोरवे, विठ्ठल कारंडे उपस्थित होते.
शेतीपंपांचे नुकसान; शेतकरी हवालदिल
कऱ्हाड : मोरणा विभागात नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचबरोबर पडझड होऊन विद्युत मीटरसह पंपगृह, त्याठिकाणी ठेवलेली रासायनिक खते वाहून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. नाटोशी गावातील २३ शेतकऱ्यांचा प्रस्ताव पंचनाम्यासहित सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँगेसचे सरचिटणीस संजय हिरवे, रंगराव जाधव, सुरेश पाटील यांनी शासकीय कार्यालयात दाखल केले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
पालच्या पूरग्रस्तांना किसान मोर्चाची मदत
कऱ्हाड : पाल (ता. कऱ्हाड) येथील पूरग्रस्तांना भाजप किसान मोर्चाच्यावतीने मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, सचिव रामकृष्ण वेताळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, कऱ्हाड उत्तर सरचिटणीस शंकरराव शेजवळ, ओबीसी मोर्चाचे राजेंद्र चव्हाण, सुनील शिंदे, रोहित चिवटे, सूर्यकांत पडवळ, शहाजी शिंदे, रामदास शिंदे, महेंद्र साळुंखे, शंकर पाटील, राजू पाटील, पालच्या सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच सुनील काळभोर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जगताप, धनंजय घाडगे, अरुण जगदाळे, शिवराज पाटील, पंडित इंजेकर, प्रशांत दळवी, गणेश खंडाईत, प्रशांत भोसले, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.