धामणीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:06+5:302021-01-04T04:31:06+5:30
माझी वसुंधरा अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार धामणी येथील न्यू ...
माझी वसुंधरा अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार धामणी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हरित शपथ घेण्यात आली. शासनाच्या या उपक्रमासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, अग्नी, आकाश या तत्त्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येत आहे. वसुंधराप्रती आपली जबाबदारी म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकांनी आपला सहभाग या उपक्रमांमध्ये घेतलेला आहे. धामणीच्या विद्यालयामध्ये या उपक्रमांतर्गत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी स्कूल समितीचे अध्यक्ष पंकज पाटील, सुंदर पुजारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पाचुपते यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापिका पाचुपते यांच्या हस्ते रोप लागवड करून या अभियानाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमासाठी नववी आणि दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो : ०३केआरडी०३
कॅप्शन : धामणी (ता. पाटण) येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका पाचुपते, पंकज पाटील, सुंदर पुजारी उपस्थित होते.