साप येथे सव्वाशे पाम वृक्षाच्या रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:28 AM2021-02-22T04:28:27+5:302021-02-22T04:28:27+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील साप येथे 'झाडे लावा, झाडे जगवा आणि प्रदूषण टाळा' असा संदेश देत रोगराईपासून बचाव करून ...
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील साप येथे 'झाडे लावा, झाडे जगवा आणि प्रदूषण टाळा' असा संदेश देत रोगराईपासून बचाव करून शुद्ध हवा ठेवणाऱ्या सव्वाशे पाम वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
सिद्धेश्वर विकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा परिसरात वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी सुमारे दहा फूट उंचीची पामची रोपे आणण्यात आली होती. यावेळी सातारा तालीम संघाचे पदाधिकारी पैलवान जीवन कापले, जगदीश शिर्के, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भगवान कदम, सदस्या उर्मिला कदम, ज्येष्ठ नागरिक काशिनाथ कदम, पैलवान दिलीप कदम, जालिंदर कदम, जालिंदर जाधव, शशिकांत कदम, रघुनाथ अडसुळे, घन:श्याम कदम, माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, नागेश अडसुळे, ज्ञानेश्वर कदम, विकास कदम, तुषार जाधव, विजय जाधव-पाटील, शाळेचे मुख्याध्यापक के. एन. जमदाडे, दादासाो कदम, विक्रम पवार, विनोद भोसले, गोविंद जाधव, सुधीर कदम, पैलवान बंडा कदम, हर्षद शेडगे, विजय कदम, प्रमोद पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सिद्धेश्वर विद्यालयाच्या परिसरात जेसीबीच्या माध्यमातून खड्डे काढून काशिनाथ कदम यांच्याहस्ते वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला. पामचे झाड हवा शुद्ध करून अनेक रोगांपासून बचाव करते. त्यामुळे पामच्या लागवडीला प्राधान्य देण्यात आले आहे. वृक्ष लागवड करण्याबरोबरच त्यांचे संगोपनही करणे अत्यंत गरजेचे असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
२१रहिमतपूर पाम
फोटो : साप, ता. कोरेगाव येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या परिसरात पाम झाडांची लागवड करण्यात आली. (छाया : जयदीप जाधव)