झाडे-झुडपे जिवंतपणी सोसतायत मरण यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:14 AM2019-02-25T00:14:57+5:302019-02-25T00:15:03+5:30

पेट्री : घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गसौंदर्याला विघ्नसंतुष्टांची नजर ...

Planting of trees and plants | झाडे-झुडपे जिवंतपणी सोसतायत मरण यातना

झाडे-झुडपे जिवंतपणी सोसतायत मरण यातना

Next

पेट्री : घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गसौंदर्याला विघ्नसंतुष्टांची नजर लागली आहे. सातारा-कास मार्गावरील देवकल फाटा ते पारंबे फाटा या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वणवा लागल्याने शेकडो हिरवीगार झाडे आगीत होरपळली. तसेच शेकडो टन चारा नष्ट होऊन कास मार्ग भकास होण्यास वेळ लागणार नाही.
कास, बामणोली येथे येणाºया प्रत्येक पर्यटकाला मायेच्या सावलीचा सुखावह स्पर्श देण्यात मोलाचा वाटा येथील घनदाट झाडी झुडपे, वृक्षांचाच आहे. येथील बहुसंख्य वनसंपदेनेच निसर्गाचे सौंदर्य वाढविलेले आहे. परंतु वणवा पेटविण्याºयांकडून वनसंपदा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गसौंदर्यही लोप पावू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वणवा लावणाºयांकडून येथील परिसर भकास करण्याचाच जणू काही ठेका घेतल्याचे दिसत आहे. हा वणवा आता वृक्षांच्याच मुळांवर उठू लागला आहे. रोपट्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर होण्यास कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पावसापासून ही झाडे कित्येक वर्षे तग धरून पर्यावरणाचे संतुलन राखत असताना आता ही झाडे वणव्यात क्षणार्धातच जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सातारा-कास मार्गावर गेल्या दीड-दोन महिन्यांपासून ठिकठिकाणी वणवा लावण्याचे प्रकार वाढले आहेत. रविवारी दुपारी देवकल फाट्यानजीक पेटविलेल्या वणव्याने रस्त्यालगत तसेच आसपास काही झाडांच्या बुंध्यांनीच पेट घेतला आहे. झाडांचे बुंधे आगीत धुपत असल्याने बुध्यांतून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. झाडाच्या बुध्यांची राख होते. तर त्यांच्या फांद्या व शेंड्याकडील भाग हिरवागार दिसत आहे. परंतु झाडांचा बुंधाच पेटला जाऊ लागल्याने ते निकामी होऊन काही झाडे उन्मळून पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा विकृत घटनांवर तत्काळ कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
वणव्यांची मालिका अखंडित..
उन्हाची तीव्रता सर्वत्र भासत असून, या परिसरातील लाखो वृक्षांमुळे वातावरणात गारवा आहे. तसेच सध्या कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. परंतु परिसरात वणव्यांची मालिका अंखडित सुरू आहे. येथील परिसरात निर्माण होणारा भकासपणा पाहता सर्वत्र विचित्र खूप दिसत आहे. सकाळी पाहावं तर सर्वकाही ठिक; परंतु सायंकाळपर्यंत नाहीसा होताना दिसत आहेत.

Web Title: Planting of trees and plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.