लोणंदमध्ये वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:35 AM2021-01-18T04:35:59+5:302021-01-18T04:35:59+5:30
लोणंद : नगरपंचायतीच्यावतीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शहरातील मालोजीराजे विद्यालय परिसर, कन्याशाळा परिसरात विविध जातींच्या ...
लोणंद : नगरपंचायतीच्यावतीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शहरातील मालोजीराजे विद्यालय परिसर, कन्याशाळा परिसरात विविध जातींच्या पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली.
त्यामध्ये आवळा, चिंच, बदाम, पिंपरणी, लिंब, बकाली लिंब, जांभूळ अशा विविध जातींच्या वृक्षांचा समावेश करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करून निसर्ग वाचविण्याची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमास नगराध्यक्ष सचिन शेळके, मुख्याधिकारी हेमंत ढोकले व शाळेतील शिक्षक वृंद व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
..........................................
कचरा टाकल्यास कारवाई : कदम
लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या आहेत. त्यामध्ये प्लास्टिक बाटल्या व इतर साहित्य आढळून येत आहे. या कचऱ्यामुळे शहरातील वितरण नलिकेस व्यत्यय निर्माण होऊन पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. संबंधित पाईपमधून चोकअप काढण्यासाठी नवे रस्ते फोडावे लागत आहेत. जर कोणी कचरा टाकताना आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल,’ अशा इशारा नगराध्यक्षा माधवी कदम यांनी दिला.
.................................................
अस्ताव्यस्त पार्किंग
सातारा : साताऱ्यातील अनेक वसाहतींमध्ये राहत असलेल्या मालकांपेक्षा वाहनांची संख्याच जास्त असते. त्यामुळे वाहने कोठे उभी करायची, असा प्रश्न असतो. त्यातच काही वाहनचालक अस्ताव्यस्त गाड्या उभ्या करतात. त्यामुळे इतरांना गाड्या उभ्या करण्यास जागा मिळत नाही. त्यातून वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. काळजी घेण्याची गरज आहे. काही वेळेला ही वाहने वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत.
.............................................
महामार्गावर कचरा
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीत ठिकठिकाणी कचरा साठून पडलेला असतो. हा कचरा संबंधित विभागाने तातडीने उचलून त्याची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे असंतोष व्यक्त केला जात आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.