कचऱ्यात जिथे-तिथे प्लास्टिक दिसे; कऱ्हाडात दररोज चोवीस टन कचऱ्याचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 10:42 PM2021-11-17T22:42:28+5:302021-11-17T22:42:41+5:30

प्लास्टिक पिशव्या, कागदांचा खच, बंदीची मोहीम गारठली

Plastic appeared everywhere in the trash; Twenty-four tons of waste collected daily in Karhada | कचऱ्यात जिथे-तिथे प्लास्टिक दिसे; कऱ्हाडात दररोज चोवीस टन कचऱ्याचे संकलन

कचऱ्यात जिथे-तिथे प्लास्टिक दिसे; कऱ्हाडात दररोज चोवीस टन कचऱ्याचे संकलन

Next

 

संजय पाटील

कऱ्हाड : शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. परिणामी, प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीचे तसेच कचऱ्यात साचणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण वाढले आहे. नाले, ओढे तसेच सार्वजनिक ठिकाणी इतर कचऱ्याबरोबर प्लास्टिक पिशव्यांचा खच पडत आहे.

शहरातून दररोज वीस टनांपेक्षा जास्त घरगुती कचरा संकलित केला जातो. या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे प्रमाण असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेतील दुकानदार तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री व वापर केला जात आहे. संबंधित दुकानदार तसेच विक्रेत्यांवर नियमित कारवाई होत नसल्याने प्लास्टिक वापर व विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात शंभरहून अधिक हॉटेल्स, चायनीज, वडापाव विक्रेते तसेच कापड दुकानदार, भांडीविक्री करणारे व्यापारी व व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.

भाजीमंडई येथील चांदणी चौक, कृष्णाबाई कार्यालय रोड, हटकेश्वर मंदिर, बापूजी साळुंखे पुतळा परिसर, मंगळवार पेठ, स्टेडियम परिसर, प्रभात टॉकीज, बाराडबरी, बसस्थानक परिसर, कर्मवीर चौक, कृष्णा नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, जलशुद्धीकरण केंद्र, दूरध्वनी केंद्र परिसर याठिकाणी प्लास्टिक कचरा साचत असल्याचे दिसून येत आहे.

जाळले तर प्रदूषण; साठवले तर कचरा

प्लास्टिक हा असा पदार्थ आहे की, तो पुरला तरी तो नष्ट होऊ शकत नाही. जाळला तर हवेचे प्रदूषण होते. त्यातून गंभीर आजारही होण्याची भीती असते. तसेच तो साठवून ठेवला तर त्यापासून दुर्गंधी व इतर आजारही होऊ शकतात.

कचऱ्यात दररोज २५ किलो प्लास्टिक

कऱ्हाड शहरातून दररोज सुमारे २४ टन कचरा संकलित केला जातो. या संकलित कचऱ्यात १० ते १२ टन सुका कचरा असतो. या सुक्या कचऱ्यात दररोज सरासरी २५ ते ३० किलो प्लास्टिक असते, असे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

पालिकेची स्वच्छता टीम

१८ : घंटागाड्या

९ : संकलन वाहने

१४० : सफाई कर्मचारी

१३ : मुकादम

१ : आरोग्य निरीक्षक

दररोज जमा होणारा कचरा

११ टन : सुका कचरा

१३ टन : ओला कचरा

विघटनासाठी लागतात शेकडो वर्षे!

१) प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत.

२) प्लास्टिक पिशव्यांची पहिली समस्या म्हणजे या पिशव्यांचे विघटन होत नाही.

३) पिशवीचे पूर्णपणे विघटन होण्यासाठी चारशे ते पाचशे वर्षांचा कालावधी लागतो.

४) आज आपण पिशवी वापरून टाकून दिली तर पुढच्या चार ते पाच पिढ्यांंना त्याचा त्रास होऊ शकतो.

Web Title: Plastic appeared everywhere in the trash; Twenty-four tons of waste collected daily in Karhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.