पुन्हा प्रक्रिया करण्याची हमी देणाऱ्या दूध, पाण्याच्या प्लास्टिकला मान्यता प्लास्टिक बंदीचे तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:43 AM2018-03-30T00:43:52+5:302018-03-30T00:43:52+5:30

सातारा : दैनंदिन व्यवहारात वापरले जात असलेले सर्वप्रकारचे प्लास्टिक, पिशव्या, वस्तू तसेच थर्मोकॉलच्या पत्रावळ्या, द्रोण साºयांवर शंभर टक्के बंदी घातली आहे.

The plastic which guarantees to be re-processed, the plastics of the plastic are three times the plastic ban | पुन्हा प्रक्रिया करण्याची हमी देणाऱ्या दूध, पाण्याच्या प्लास्टिकला मान्यता प्लास्टिक बंदीचे तीन तेरा

पुन्हा प्रक्रिया करण्याची हमी देणाऱ्या दूध, पाण्याच्या प्लास्टिकला मान्यता प्लास्टिक बंदीचे तीन तेरा

Next

जगदीश कोष्टी ।
सातारा : दैनंदिन व्यवहारात वापरले जात असलेले सर्वप्रकारचे प्लास्टिक, पिशव्या, वस्तू तसेच थर्मोकॉलच्या पत्रावळ्या, द्रोण साºयांवर शंभर टक्के बंदी घातली आहे. यातून केवळ दुधाच्या पिशव्या, अर्धा लिटरपेक्षा जास्त क्षमतेच्या पाण्याच्या बाटल्या, रोपवाटिका व कृषी क्षेत्रात वापरला जाणारा कुजणाºया प्लास्टिकलाच कायद्याने परवानगी दिली आहे. त्यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्वच क्षेत्रात वाढला आहे. घरातून बाहेर पडतानाच कापडी पिशवी घेऊन जाण्याचा कंटाळा केला जातो अन् प्लास्टिक पिशव्यांचा आग्रह धरला जात आहे. व्यापारीही ग्राहक तुटायला नको म्हणून सर्रास वापर करतात. यासंदर्भात कारवाई होते. तेव्हा वादावादीचे प्रसंग उद्भवतात. अमूक जाडीच्या प्लास्टिकला परवानगी आहे. जुना माल शिल्लक आहे. तो संपला की बंद करतो, ही कारणे मिळतात.
प्लास्टिक बंदीबाबत अध्यादेश सर्व पालिकांना मिळाला आहे. त्यानुसार शिल्लक प्लास्टिक संपविण्यासाठी २३ एप्रिलची मुदत आहे. मुदतीत साठा संपवायचा आहे, अन्यथा तो परराज्यात पाठवावा. शिल्लक पिशव्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जमा करण्याची सक्ती आहे.

बाटलीवर हवी हमी
नव्या अद्यादेशातून दुधाच्या पिशव्या, अर्धा लिटरपेक्षा जास्त क्षमतेच्या पाण्याच्या बाटल्यांना परवानगी दिली आहे. हे करत असताना संबंधित कंपनीने दुधाची पिशवी किंवा बाटलीवर हे प्लास्टिक पुनरर्प्रक्रिया करण्यात येईल, असे लिहून हमी देणे आवश्यक आहे. तसेच रोपवाटिका, शेततळे, पॉलिहाऊस, ग्रीनहाऊसमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक कुजणारे असते. त्यामुळे त्यांनाही त्यातून वगळण्यात आले आहे.
 

सातारा शहरात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे. प्लास्टिक उत्पादन, वाहतूक किंवा वापर करताना आढळला तर दंडात्मक तसेच फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत.
- शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा.

Web Title: The plastic which guarantees to be re-processed, the plastics of the plastic are three times the plastic ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.