शनैश्वर देवस्थान धर्मरक्षेचे व्यासपीठ : बानुगडे-पाटील
By admin | Published: November 23, 2014 08:41 PM2014-11-23T20:41:44+5:302014-11-23T23:48:20+5:30
सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे सह परराज्यातूनही भाविकांनी मोठी गर्दी केली
पिंपोडे बुद्रुक : ‘समाजामध्ये चंगळवाद फोफावला असून, लोक संस्कृती व धर्माची ओळख विसरू लागले आहेत. मात्र, शनैश्वर देवस्थान आध्यात्मिकच नव्हे तर धर्मरक्षेचे आदर्श व्यासपीठ आहे,’ असे प्रतिपादन प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी देवस्थानच्या वतीने आयोजित शनी अमावस्येच्या कार्यक्रमात केले. यावेळी देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज, आसवलीचे उदयननाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.सोळशी, ता. कोरेगाव येथील सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थानच्या वतीने शनी अमावस्येनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. भाविकांना उन्हात उभे राहावे लागू नये म्हणून दर्शनबारीवर मंडपाचे काम करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन उदयननाथ महाराजांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी रात्री एक वाजता शनिदेवास ५२ पात्री लघुरुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर नवग्रहशांती होमहवन व सकाळी महाआरती करण्यात आली. सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या ठिकाणांसह परराज्यातूनही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे नियोजन शनैश्वर देवस्थान ट्रस्ट व शनैश्वर सेवेकरी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले
होते. (वार्ताहर)