वसना नदीवर अपघाताची शक्यता, पुलाची दुर्दशा : प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 06:42 PM2020-01-02T18:42:44+5:302020-01-02T18:45:11+5:30

कोरेगाव तालुक्यातील हा सर्वात महत्त्वाचा पूल असून, या पुलावरून पुणे, अहमदनगरकडे जाणारी अवजड वाहतूक होते. त्याचबरोबर सातारा आणि पुणे जिल्'ातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूकदेखील याच पुलावरून होते. पुलाच्या दोन्ही बाजूस तीव्र वळण असल्याने पुलावर नेमके कोणते वाहन आहे, हे इतर वाहनचालकांच्या लक्षात येत नाही.

The plight of the bridge over the Vasna river | वसना नदीवर अपघाताची शक्यता, पुलाची दुर्दशा : प्रशासनाचे दुर्लक्ष

सातारारोड ते जळगावदरम्यान वसना नदी पुलाची झालेली दुर्दशा.

Next
ठळक मुद्दे सातारारोड-जळगाव रस्ता

कोरेगाव : खंडाळा-शिरोळ (जयसिंगपूर) राज्यमार्गावर सातारारोड ते जळगावदरम्यान वसना नदीवरील पुलाची मोठी दुर्दशा झाली असून, संरक्षक पाईप गायब झाल्या आहेत. पुलाला कठडेदेखील नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रचंड वर्दळ असलेल्या या मार्गावरील पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची मागणी होत आहे.

कोरेगाव तालुक्यातील हा सर्वात महत्त्वाचा पूल असून, या पुलावरून पुणे, अहमदनगरकडे जाणारी अवजड वाहतूक होते. त्याचबरोबर सातारा आणि पुणे जिल्'ातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूकदेखील याच पुलावरून होते. पुलाच्या दोन्ही बाजूस तीव्र वळण असल्याने पुलावर नेमके कोणते वाहन आहे, हे इतर वाहनचालकांच्या लक्षात येत नाही.

पावसाळ्यापासून पुलाची दुर्दशा झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. पावसाळ्याचे निमित्त सांगून वेळ निभावून नेण्यात आली, मात्र पावसाळा उलटून चार महिने झाले तरी पुलाच्या दुरुस्तीचा मुहूर्त लागत नाही. बांधकाम विभागामध्ये अभियंत्यांमध्ये ताळमेळ नसल्याने या पुलाबाबत नेमके कोणते धोरण आहे, याचा उलगडा होत नाही.

  • पर्यायी मार्ग म्हणून सर्वाधिक वापर

सातारा-वाढे-वडूथ-शिवथर-वाठार स्टेशन या २४ तास रहदारी असलेल्या मार्गाला कोरेगाव तालुक्यातील मार्ग हा पर्यायी म्हणून वापरला जातो. मध्यंतरीच्या काळात वडूथ-आरळेदरम्यान कृष्णा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीच्याकाळात वाहतूक वळविण्यात आली होती, ती वाहतूक याच पुलावरून सुरू होती. त्याचबरोबर राष्टÑीय महामार्गावरील टोल वाचविण्यासाठी अनेक अवजड वाहनांचे चालक याच मार्गाचा वापर करतात, त्यामुळे भविष्यात अपघात टाळायचे झाल्यास बांधकाम विभागाने तातडीने पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक बनले आहे.

 

 

Web Title: The plight of the bridge over the Vasna river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.