फ्यूज बॉक्सची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:21+5:302021-03-04T05:14:21+5:30

तांबवे : कऱ्हाड ते पाटण मार्गावर रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी असलेले फ्यूज बॉक्स उघडे पडले आहेत. काही ठिकाणी हे ...

The plight of the fuse box | फ्यूज बॉक्सची दुर्दशा

फ्यूज बॉक्सची दुर्दशा

Next

तांबवे : कऱ्हाड ते पाटण मार्गावर रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी असलेले फ्यूज बॉक्स उघडे पडले आहेत. काही ठिकाणी हे बॉक्स अक्षरश: जमिनीला टेकले आहेत, तर काही ठिकाणी फ्यूजही गायब झाले असून, तारांवर खेळ सुरू आहे. वीज वितरणने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

श्वानांचा उपद्रव

कुसूर : कोळे, ता. कऱ्हाड परिसरात मोकाट श्वानांच्या उपद्रवात वाढ झाली असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या मोकाट श्वानांनी परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांत अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तात्काळ या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हातगाडे वाढले

कऱ्हाड : येथील बाजारपेठ मार्ग, तसेच अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फिरस्त्या विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. विक्रेते आपले हातगाडे घेऊन बाजारपेठेतील रस्त्यावर घुसत आहेत. अनेक जण रस्त्यातच हातगाडा उभा करून व्यवसाय करीत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बेशिस्त हातगाडे उभे करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

भाजी रस्त्यावर (फोटो : ०३इन्फोबॉक्स०२)

कऱ्हाड : येथील मुख्य पोस्ट कार्यालय रस्त्यावर बसून भाजी विक्रेत्यांकडून व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेतर्फे संभाजी भाजी मंडईत जागा देऊनही तेथे विक्रेते बसत नाहीत. मुख्य पोस्ट कार्यालय रस्त्यात बसूनच ते व्यवसाय करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.

बसथांबे उद्ध्वस्त

मल्हारपेठ : कऱ्हाड-नवारस्तादरम्यान मार्गावर एकही झाड शिल्लक राहिलेले नाही. उभे असणारे बसथांबेही भुईसपाट झाले आहेत. कऱ्हाड-पाटण या ३४ किलोमीटर अंतरातील अनेक थांबे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. या मार्गावर बसथांबे उभारण्याची मागणी होत आहे.

Web Title: The plight of the fuse box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.