न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:05+5:302021-07-09T04:25:05+5:30
सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असतानाच लहान मुलांना कोविड सोबतच बॅक्टेरियल न्यूमोनियाचाही धोका आहे. यापासून संरक्षणासाठी ...
सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असतानाच लहान मुलांना कोविड सोबतच बॅक्टेरियल न्यूमोनियाचाही धोका आहे. यापासून संरक्षणासाठी सोमवारपासून (दि. १२) राज्यभरात नऊ महिन्यांच्या आतील बालकांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. बालकांना जंतुसंसर्गापासून संरक्षण देण्यासाठी न्यूमोकोकल उपयुक्त असल्याचे मत वैद्यकीयतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत नाही तोवरच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्याने सर्वांचीच पाचावर धारण बसली आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चिमुकल्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना बॅक्टेरियल न्यूमोनियाचा धोका सर्वाधिक असल्याचे मानले गेले आहे. लहान मुलांच्या संरक्षणासााठी शासनामार्फत विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
चौकट :
काय आहे न्यूमोकोकल न्यूमोनिया
नवजात बालकांमध्ये वातावरणातील सर्व विषांणूशी लढण्याइतकी प्रतिकारशक्ती वाढलेली नसते. परिणामी हवामान बदल, पाण्यात बदल झाले की मुलं आजारी पडत. त्यांच्यातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी न्यूमोकोकलची लस दिली जाते. त्यामुळे मुलांमधील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
कोणत्या आजाराला ही उपयुक्त आहे
रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने शासनाच्या वतीने नऊ महिन्यांच्या आतील बाळांना न्यूमोकोकलची लस दिली जाणार.
प्रतिकारशक्ती क्षीण झालेल्या कर्करुग्णांनाही ही लस दिली जाते
न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी ही लस सर्वाधिक उपयोगी असते.
तीन टप्प्यात मिळणार डोस
न्यूमोकोकल ही लस नऊ महिन्यांच्या आतील बालकांना दिली जाणार आहे. त्यांतर्गत पहिला डोस दीड महिन्यांच्या बालकांना, दुसरा डोस १४ आठवड्यांच्या बालकांना तर तिसरा डोस नऊ महिन्याच्या बालकांना जाणार आहे.
कोट
लहान बाळांमधील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी न्यूमोकोकलचा वापर अनेक वर्षांपासून होत आहे. शासकीय स्तरावर याचं लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याने लहानग्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. वातावरणातील विषाणूंचा प्रभाव कमी करण्यासाठी हे लसीकरण उपयुक्त ठरणार आहे.
- डॉ. भास्कर यादव, बालरोगतज्ज्ञ, सातारा