वनविभागाच्या मोबाईलवर ‘द्या शिकारीची माहिती पटकन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 11:01 PM2018-03-02T23:01:12+5:302018-03-02T23:01:12+5:30

सातारा : वन्यजीवांचे संरक्षण अन् पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाच्या वतीने विविध कार्यक्रम हाती घेतले जात असताना आता वनविभागाची अनोखी ‘कॉलरट्यून’ नागरिकांमध्ये प्रबोधन करू लागली आहे

'Poaching information quickly' on forest department | वनविभागाच्या मोबाईलवर ‘द्या शिकारीची माहिती पटकन’

वनविभागाच्या मोबाईलवर ‘द्या शिकारीची माहिती पटकन’

googlenewsNext

सचिन काकडे ।
सातारा : वन्यजीवांचे संरक्षण अन् पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाच्या वतीने विविध कार्यक्रम हाती घेतले जात असताना आता वनविभागाची अनोखी ‘कॉलरट्यून’ नागरिकांमध्ये प्रबोधन करू लागली आहे. वन अधिकारी व कर्मचाºयांना फोन लावताच त्यांच्या मोबाईलवरून ‘वन्यजीवांचे करू संरक्षण, द्या शिकारीची माहिती पटकन’ असे बोल कानी पडू लागले आहेत.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्याला निसर्गाचे अनमोल वरदान लाभले आहे. जिल्ह्यात ज्याप्रमाणे अनेक दुर्लभ वृक्ष, वनस्पती आढळतात, त्याचप्रमाणे पशुपक्षी व प्राण्यांचे अस्तित्व आजही टिकून आहे. मात्र, बेसुमार वृक्षतोड व शिकारीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून, पशुपक्ष्यांच्या अधिवासावरही संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास रोखण्याबरोबरच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाच्या वतीने नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे.

आजपर्यंत सूचनाफलक, पोस्टर आदींच्या माध्यमातून नागरिकांना वृक्षांचे महत्त्व पटवून दिले जात होते. वन्यजीवांचे संरक्षण व्हावे, याची माहिती दिली जात होती. मात्र, आता याही पुढे जाऊन वनविभागाची प्रबोधनाचा नवा मार्ग स्वीकारला आहे. जिल्ह्यातील वनअधिकारी व कर्मचाºयांच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर नागरिकांना ट्रिंग..ट्रिंग... असे ऐकू न येता प्रबोधनात्मक कॉलरट्यून ऐकू येऊ लागली आहे.

‘वन्यजीवांचे करू संरक्षण, द्या शिकारीची माहिती
शिरता प्राणी गावा येथे कळवा’ असे या कॉलरट्यूनचे शब्द असून, ही कॉलरट्यून नागरिकांमध्ये जनजागृती करू लागली आहे. जिल्ह्यातील १४८ वनरक्षक व ४८ वनपाल यांच्या शासकीय मोबाईल नंबरवर शासनाच्या वतीने ही कॉलरट्यून सुरू करण्यात आली आहे.
हा आहे संदेश...

कॉलरट्यूनच्या माध्यमातून वनविभागाने वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी पाऊल पुढे टाकले आहे. अवैध वृक्षतोड व जंगलात लावणारे वणवे रोखण्यासाठीही अशा प्रकारच्या घटनांनी माहिती तातडीने वनविभागास द्यावी, असे आवाहनही या ट्यूनच्या माध्यमातून केले आहे.

गावोगावी सूचनाफलक
उन्हाळा सुरू झाला असून, जिल्ह्यात वणवे लावण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. या वणव्यात वृक्षसंपदेची हानी होत असून शेकडो पशू-पक्षी जीव गमावत आहेत. अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी वनविभागाने गावोवागी सूचनाफलक लावले आहेत.

Web Title: 'Poaching information quickly' on forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.