संवेदना जागवणाऱ्या कविता : रंजना सानप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:00+5:302021-02-15T04:34:00+5:30
मायणी : ‘नव्या युगाच्या कविता’ या कवितासंग्रहातील कविता या मानवी मनाच्या संवेदना जागवणाऱ्या कविता आहेत. त्यामुळे कोरोनासदृश जगात माणूस ...
मायणी : ‘नव्या युगाच्या कविता’ या कवितासंग्रहातील कविता या मानवी मनाच्या संवेदना जागवणाऱ्या कविता आहेत. त्यामुळे कोरोनासदृश जगात माणूस माणसापासून दुरावत असताना या कविता माणसाच्या मनावर फुंकर घालणाऱ्या आहेत,’ असे मत कवयित्री व लेखिका रंजना सानप यांनी व्यक्त केले.
कवयित्री व लेखिका डॉ. स्मिता गिरी आणि कवी व समीक्षक वसंत भागवत संपादित ‘नव्या युगाच्या कविता’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा निर्मिती प्रकाशन येथील आदित्य सभागृह पार पडला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. दयानंद ठाणेकर, लेखक व कवी मंदार पाटील, गायक कबीर नाईकनवरे, रेश्मा गायकवाड, गंगाधर म्हमाने, विजय कोरे, प्रवीण राघवण, आदर्श सानप उपस्थित होते.
सानप म्हणाल्या, ‘या संपादित कवितासंग्रहाचा नवा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला आहे. कारण कोरोनामुळे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे या बदलाचे स्थित्यंतर प्रत्येक कवितेतून पानापानावर उमटत राहते. या घडीला हा कवितासंग्रह येणेही बाब खूपच आशादायी आहे. सगळ्यांनी या नव्या युगाचा कविता वाचून नव्या पर्वाची सुरुवात करणे आवश्यक आहे.
अनिल म्हमाने यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शोभा चाळके यांनी आभार मानले.