सांबरवाडी फाटा येथे पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:50+5:302021-07-12T04:24:50+5:30
पेट्री : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन असल्यामुळे शहराच्या पश्चिमेस कास परिसरात विनाकारण फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शनिवारी, रविवारी ...
पेट्री : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन असल्यामुळे शहराच्या पश्चिमेस कास परिसरात विनाकारण फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शनिवारी, रविवारी दिवसभर सांबरवाडी फाटा येथे तालुका पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शनिवार, रविवार वीकेंड लॉकडाऊन असतानाही बहुसंख्य पर्यटक रविवारी सकाळपासून कासच्या दिशेने जात असताना दिवसभर तालुका पोलिसांनी नाकाबंदी करून परिसरात गर्दी होऊ नये, तसेच वीकेंड लॉकडाऊनचे नियम पाळले जावेत, यासाठी परवानगी असलेल्या व अत्यावश्यक सेवेच्या गाड्या वगळता बहुतांश विनाकारण फिरणाऱ्यांच्या गाड्या यवतेश्वर घाटातून माघारी पाठवल्या.
सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे, मास्क न लावणारे तसेच विनाकारण फिरणारे वाहनचालक व मोटार वाहन कायदा कलमान्वये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये शनिवारी चाळीस वाहनचालकांवर कारवाई करून आठ हजारांचा दंड व रविवारी तीस जणांवर कारवाई करून सात हजारांचा दंड वसूल केला.
ही कारवाई तालुका पोलीस स्टेशनमार्फत पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुहास पवार, रमेश शिखरे यांच्याकडून करण्यात आली.
११पेट्री
( फोटो -सागर चव्हाण )