शिराळ्यात पोलीस-काँग्रेस नेत्यांत धक्काबुक्की

By admin | Published: September 13, 2015 12:17 AM2015-09-13T00:17:39+5:302015-09-13T00:17:57+5:30

दुष्काळ जाहीर करण्यासाठी मोर्चा : तहसील कार्यालयात मेंढरे सोडली, केंद्र व राज्य शासनावर टीका

Police and Congress leaders shout in the winter | शिराळ्यात पोलीस-काँग्रेस नेत्यांत धक्काबुक्की

शिराळ्यात पोलीस-काँग्रेस नेत्यांत धक्काबुक्की

Next

सागाव : शिराळा येथे कॉँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेस अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, प्रदेश कॉँग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले. यावेळी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना राज्य सरकारमधील मंत्री बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी यापुढील काळात रस्त्यावर उतरून संघर्षासाठी कॉँग्रेस कायकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.
या मोर्चामध्ये मेंढरासह शेतकरी मोठ्या संख्येने होते. शिराळा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मेंढरे सोडण्यात आली. यावेळी अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे सरचिटणीस हिंमत सिंग, प्रदेश कॉँग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख, राहुल आवाडे, धु्रवीताई लाकडे प्रमुख उपस्थित होते. स्वागत विधानसभा युवक अध्यक्ष प्रजित यादव यांनी केले. प्रास्ताविक हातकणंगले लोकसभा युवक अध्यक्ष जयराज पाटील यांनी केले.
यावेळी कदम म्हणाले, भाजप सरकार हे उद्योगपतींचे सरकार आहे. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी युवक कॉँग्रेसने पुढाकार घेतला असून, भूमी अधिग्रहण कायदा केंद्राने मागे घेतला. हा विजय कॉँग्रेसचाच आहे. राज्यामध्ये शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर आहेत. हे शेतकऱ्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. पंतप्रधान मन की बात करत फिरत आहेत. आता मन की बात बास, आता कामाचे बोला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपचे मंत्री तोंडाला येईल ते वक्तव्य करत फिरत आहेत आणि ते भाजपचे नेतृत्व करत फिरत आहेत आणि ते भाजपचे नेतृत्व डोळ्यानी पाहत आहे. स्वातंत्र्य लढ्यानंतर कॉँग्रेसने दिलेले अधिकार हे सरकार मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे.
या सरकारला जाग आणण्यासाठी संघर्ष हाच पर्याय आहे. येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात म्हणूनच लढवायच्या आहेत. या जोमाने कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम करावे. शिराळ्याच्या नागपंचमीस गतवैभव प्राप्त करण्यासाठी युवक कॉँग्रेस रस्त्यावर उतरेल, अशी ग्वाही कदम यांनी देत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊ, असे कदम म्हणाले.
यावेळी हिम्मत सिंग म्हणाले, नरेंद्र मोदी लबाड व बोलणारे पंतप्रधान असून, आंदोलने, मोर्चे काढल्याशिवाय या सरकारकडून काहीही मिळणार नाही. भाजपची लबाडी जास्त दिवस चालणार नाही.
यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले, भाजप सरकार झोपेचे सोंग घेऊन काम करत आहे. ते हुकूमशाही पद्धतीने गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे, ती कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. जनतेचा खोटा कळवळा दाखविणारे खासदार व आमदार यांची आता आंदोलने कुठे गेली आहेत. दुष्काळाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असताना प्रशासनाने कोणतेही पंचनामे केलेले नाही, ते करून नुकसानभरपाई द्यावी, केशरी रेशनकार्डवरील धान्य सुरू करावे, शिराळ्याच्या नागपंचमीला गतवैभव मिळवून द्यावे. तालुक्याच्या अनेक मागण्या केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याची पूर्तता करण्यात यावी.
यावेळी तालुका कॉँग्रेस अध्यक्ष हणमंतराव पाटील, संपतराव देशमुख, इंद्रजित साळुंखे, सभापती चंद्रकांत पाटील, राजीव मोरे, प्रतापराव यादव, महादेव कदम, के. डी. पाटील, जितेंद्र पाटील, जयकर कदम, किरण चव्हाण, रणजित पाटील, धनराज पाटील, विजय पवार, आनंदराव पाटील, अभिजित पाटील, शंकर कदम, तानाजी कुंभार, संदीप जाधव, विकास नांगरे, पोपट पाटील आदी उपस्थित होते. सत्यजित पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Police and Congress leaders shout in the winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.