पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या युवकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:39 AM2021-05-23T04:39:11+5:302021-05-23T04:39:11+5:30

सातारा : कोरोना महामारीत रस्त्यावरील बोगदा परिसरात विनाकारण आणि विनापरवाना फिरणाऱ्यास अटकाव केला म्हणून दोन पोलिसांच्या अंगावर धावून जात ...

Police arrest youth for pushing | पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या युवकास अटक

पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या युवकास अटक

googlenewsNext

सातारा : कोरोना महामारीत रस्त्यावरील बोगदा परिसरात विनाकारण आणि विनापरवाना फिरणाऱ्यास अटकाव केला म्हणून दोन पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की करणाऱ्या साताऱ्यातील एका युवकास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली.

तुशांत राजू नायडू (वय ३०, रा. जयविजय कॉलनी, देशपांडे मारुती मंदिराजवळ, शाहूपुरी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्यामुळे विनाकारण, विनापरवाना, विनामास्क फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. गुरुवार, दि. २० रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पथक यवतेश्वर जाणाऱ्या रस्त्यावर बोगदा परिसरात पेट्रोलिंग करत असताना तुशांत नायडू हा विनाकारण आणि विनापरवाना फिरत असल्याचे दिसून आले. यावेळी त्याला पोलिसांनी अडवले आणि ‘कशासाठी बाहेर फिरत आहात? तुमचे नाव काय..?, अशी विचारणा केली असता तुशांत याने मोठ्यामोठ्याने गोंधळ करत ‘तुम्ही मला विचारणारे कोण..?, तुम्ही कशासाठी मला थांबवता..?,’ असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलीस हवालदार इनायतुल्ला मुल्ला आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या ठाणे अंमलदाराच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली.

याची तक्रार इनायतुल्ला मुल्ला यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर तुशांतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला दि. २१ रोजी अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे हे करत आहेत.

Web Title: Police arrest youth for pushing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.