पोलिस सुस्त..ग्रामस्थ सतर्क !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:19 PM2017-09-08T20:19:36+5:302017-09-08T20:24:47+5:30

कवठे : वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने सुरूर येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत असतानाच

 Police dormant ... cautious! | पोलिस सुस्त..ग्रामस्थ सतर्क !

पोलिस सुस्त..ग्रामस्थ सतर्क !

Next
ठळक मुद्दे. ग्रामसभेतील नागरिकांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना जाणून घेऊन पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले.पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे गोरगरीब जनतेला वेठीस धरले जात आहे. असा आरोपकाही लोकांना हाताशी धरून गुन्हे दाखल केल्याचा आरोप

कवठे : वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने सुरूर येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत असतानाच शुक्रवारी चोरीच्या संशयांवरून एकाला ग्रामस्थांनी पकडले. एवढेच नव्हे तर ग्रामसभा बोलावून ग्रामस्थांनी गावाशेजारील वसाहत हटविण्याचीही मागणी केली. यावेळी ग्रामस्थ संतप्त झाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरूर येथील भूषण हेमंत चव्हाण यांच्या घराचा छत उचकटून गुरुवारी रात्री जक्कल काळेने घरात प्रवेश केला. दहा तोळ्याचे दागिने घेऊन तो जात असतानाच घरातील लोक जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केला असता ग्रामस्थ गोळा झाले. त्यांच्या मदतीने जक्कल रंग्या काळेला पकडून बेदम चोप देऊन भुर्इंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, सुरूर परिसरात अनेकदा चोºया होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी अनेक वेळा भुर्इंज पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांकडून काहीच हालचाली होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पोलिसांच्या कामचुकारपणामुळे सुरूर ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यावर काहीतरी तातडीने तोडगा निघालाच पाहिजे, अशी भूमिका घेऊन ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी ग्रामसभा बोलाविली. यावेळी वाईचे उपविभागीय अधिकारी आनित टिके, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनाही या ग्रामसभेला बोलविण्यात आले.

यावेळी संतप्त ग्रामस्थांनी सुरूर परिसरात होत असलेल्या चोºयांचा पाढाच पोलिस अधिकाºयांसमोर वाचला. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे गोरगरीब जनतेला वेठीस धरले जात आहे. असा आरोपही यावेळी करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत गावाशेजारी वसलेली वसाहत हटविण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 दमदाटी करून ७० पोती धान्य गोळा !
सुरूर गावाशेजारी गेल्या अनेक वर्षांपासून एक वसाहत आहे. शिवारातील पिके, चंदनाची झाडे आणि घरे फोडणे अशा पद्धतीचे अनेक उपद्रवी उद्योग केल्याच्या आरोपावरून या वसाहतीमधील लोकांना पोलिसांनी अटक केली होती. १९९५ साली सुरूर ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे रीतसर कारवाईच्या मागणीसह त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. पण त्यावेळच्या पोलिस प्रशासनाने या जबाबदार गावच्या पदाधिकाºयांवर या वसाहतीमधील काही लोकांना हाताशी धरून गुन्हे दाखल केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील गावांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक हंगामातील पिकांचे उत्पादन शेतकºयांच्या घरी आल्यावर या वसाहतीमधील लोक दारोदारी फिरून अंदाजे ७० पोती धान्य गोळा करीत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या त्रासाला कंटाळून ग्रामसभा बोलविण्यात आली. ग्रामसभेतील नागरिकांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना जाणून घेऊन पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले.

 

 

Web Title:  Police dormant ... cautious!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.