गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:46 AM2021-09-10T04:46:32+5:302021-09-10T04:46:32+5:30

कऱ्हाड : नांदगाव पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील गावात गणेश उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी; तसेच गणपती ...

Police mobilization on the backdrop of Ganeshotsav | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन

Next

कऱ्हाड : नांदगाव पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील गावात गणेश उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी; तसेच गणपती उत्सव शांततेत व कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा केला जावा, यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने गावातील रस्त्यावरून संचलन करण्यात आले. यावेळी दुतर्फा उभे राहून ग्रामस्थ पाहत होते.

वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून गणेश उत्सव ओळखला जातो. प्रत्येक गावातील अनेक गणेश मंडळे हा उत्सव उत्साहात साजरा करतात. मात्र, मागीलवर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन गणेशोत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली होती. यंदा त्यात थोडी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गावातील अनेक मंडळांनी मंडप उभारले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे बैठकही झाली. त्यात शासकीय सर्व नियम सांगण्यात आले. त्यानुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनाने केले आहे. त्यानुसार गुरुवारी कऱ्हाड पोलीस ठाण्याच्यावतीने येथे पोलीस संचलन करण्यात आले.

फोटो

काले (ता. कऱ्हाड) येथे गणेश उत्सवानिमित्ताने पोलीस प्रशासनाने रूट मार्चिंग केले.

Web Title: Police mobilization on the backdrop of Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.