पोलिस ठाण्यातच अधिकाऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 03:32 AM2017-08-12T03:32:16+5:302017-08-12T03:32:16+5:30
वादावादी केल्यानंतर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या एका संशयिताने फलटण शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश धस यांच्यावर हल्ला केला.
फलटण (जि.सातारा) : वादावादी केल्यानंतर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या एका संशयिताने फलटण शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश धस यांच्यावर हल्ला केला. यामध्ये धस यांच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांचा एक दातही तुटला. याप्रकरणी कुमार गौतम रणदिवे (३१) याला पोलिसांनी अटक केली आहे.
कुमार रणदिवे हा त्याच्या दोन मित्रांसमवेत अमोल डोंबाळे यांच्या वडापाव गाड्यावर वडापाव खाण्यासाठी गेला होता. पैसे न देताच रणदिवे आणि त्याचे मित्र जाऊ लागले. यावेळी डोंबाळे यांनी पैसे मागितल्याने चिडून रणदिवेने डोंबाळे यांच्या हातावर चाकूने वार केला. त्यानंतर रणदिवे आणि त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी कडईतील गरम तेल डोंबाळे यांच्यावर फेकले व गाडा उलटून निघून गेले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी रणदिवेला पोलीस ठाण्यात नेले असता त्याने धस यांच्यावर हल्ला केला.