पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीला उडवून ट्रकचालकाचा पलायनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 03:15 PM2018-03-17T15:15:50+5:302018-03-17T15:15:50+5:30
साताऱ्यातील पोलीस भरतीत बंदोबस्त पूर्ण करून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून फलटणकडे निघालेले फलटण शहरचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या कारला वाई तालुक्यातील बदेवाडी येथील पुलावर पाठीमागून आलेल्या मालट्रकने धडक दिली.
फलटण (सातारा) : साताऱ्यातील पोलीस भरतीत बंदोबस्त पूर्ण करून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून फलटणकडे निघालेले फलटण शहरचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या कारला वाई तालुक्यातील बदेवाडी येथील पुलावर पाठीमागून आलेल्या मालट्रकने धडक दिली. त्यामध्ये पोलीस निरीक्षक सावंत जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला पकडले.
याबाबत माहिती अशी की, सातारा येथे सुरू असलेल्या पोलीस भरतीचा बंदोबस्त करून पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत हे फलटणकडे चाललेले होते. ते शनिवारी दुपारी भुईंज हद्दीतील बदेवाडी पुलावर आले. त्यावेळी सावंत यांच्या कारला पाठीमागून आलेल्या मालट्रकने धडक दिली. यामध्ये सावंत यांची कार रस्ता दुभाजकाला धडकली. सुदैवाने या अपघातातून सावंत बचावले. त्यांना भुईंज परिसरातील ग्रामस्थांनी भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अपघातानंतर पळून चाललेल्या ट्रकचालकास ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले. घटनास्थळी भुईंज पोलीस हजर झाले आहे