रहिमतपूर शहरात पोलिसाचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:44 AM2021-08-17T04:44:42+5:302021-08-17T04:44:42+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पोलीस ठाण्याच्यावतीने स्वातंत्र्यदिन, मोहरम व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी संचलन करण्यात आले. या संचलनात ...
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पोलीस ठाण्याच्यावतीने स्वातंत्र्यदिन, मोहरम व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी संचलन करण्यात आले. या संचलनात एकोणतीस कर्मचारी व पाच अधिकारी सहभागी झाले होते.
कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या उपस्थितीत मॉक ड्रील व सशस्त्र संचलन करण्यात आले. यामध्ये रहिमतपूर पोलीस ठाण्यासह कोरेगाव, पुसेगाव व वाठार स्टेशन पोलीस ठाण्यातील पाच अधिकारी, तेरा पोलीस अंमलदार व कोरेगाव विभागातील सोळा अंमलदार सहभागी झाले होते. रहिमतपूर पोलीस ठाण्यापासून सुरू झालेले संचलन पोलीस ठाणे ते गांधी चौक - गणपती मंदिर - रोकडैश्वर मंदिर - भैरोबा गल्ली - बागवान टेक - डांगे मजिद मुहल्ला - एस. टी. स्टँड चौक मार्गे पोलीस ठाणे असे काढण्यात आले. संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्याकडेला गर्दी केली होती. या संचलनाचे नेतृत्व रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी केले होते.
फोटो
रहिमतपूर शहरातून शनिवारी पोलिसांनी संचलन केले. (छाया : जयदीप जाधव)