पोलीस ठाण्याबाहेर तीन ट्रक पेटवले

By admin | Published: October 25, 2015 12:17 AM2015-10-25T00:17:04+5:302015-10-25T23:48:32+5:30

कवठेमहांकाळची घटना : वाळूच्या दोन ट्रकचा समावेश

Police outposted three trucks outside the station | पोलीस ठाण्याबाहेर तीन ट्रक पेटवले

पोलीस ठाण्याबाहेर तीन ट्रक पेटवले

Next


३० एप्रिल १९०९ च्या सूर्योदयापूर्वी ५ वाजून १५ मिनीटांनी या दैवी गुणसंपन्न बालकाचा जन्म झाला. त्याचवेळी वरखेड क्षेत्री एक घटना घडली. विदेही मूर्ती आडकोजी अलिकडे आपलं स्थान सोडून सहसा कोठे जाईनात पण त्या दिवशी अगदी सकाळी हा अवलिया महत्मा रोमरोमी हर्षाने फुलला. ते जेथे पहुडले होते तेथून उठले व पाच-सहा घरांपलीकडच्या तुकाराम बुवा वानखडे यांचेकडे आलेत. दार ठोठावू लागले व ‘माहा आंबा दे, माहा आंबा दे!’ म्हणत ठाण मांडून बसलेत. तेवढ्यात आजुबाजूचे लोक तेथे आले. तुकाराम बुवांनी घरातून पाच आंबे आणलेत. बाकी लोकही आंबे आणून त्यांच्या पुढ्यात ठेवू लागले. पण त्यातील एकाही आंब्याला ते हात लावेनात. तुकाराम बुवाचा हात पकडून ‘माहा आंबा दे!’ असे पुन्हा पुन्हा हट्टाने म्हणून लागले. तुकारामजीच्या पत्नी बजावार्इंना आठवण झाली की, आडकोजी महाराजांनी मंजुळेच्या तोंडात आंबा पिळला होता. ती गर्भार आहे. तेव्हा यावलीला जावून पहा. बजाबाईच्या या सूचनेवरुन तुकारामबुवाला सर्व अर्थ उलगडला. त्यांनी समर्थांना नमस्कार केला व तडक यावलीचा रस्ता धरला. यावलीला येवून पहातात तर मंजुळेच्या झोपडीजवळ देशमुखांच्या वाड्यात मंगलवाद्य वाजत होती. बजाबाईचा अंदाज खरा ठरला होता. त्यांना ‘माहा आंबा दे!’ चा अर्थ कळला; पण या एक दिवसाच्या मुलाला महाराजांजवळ नेणे शक्य नाही. म्हणून तुकारामबुवा त्वरित वरखेडला गेले. त्यांनी श्री सदगुरु आडकोजीचे पाय धरले व म्हणाले ‘बाबा! तुमचा आंबा थोड्याच दिवसात आणून देतो.’ समर्थांच्या मुखावर स्मित झळकलं; पण रोज केव्हा तरी त्यांच्या दारात येवून ‘माहा आंबा दे!’ असा आलख जागवायला मात्र ते विसरले नाहीत.
महाराजांनी आपल्या ‘माझी आत्मकथा’ मध्ये म्हटले आहे - तुकड्यादास म्हणे नवसे मी झाले। प्रसादे लाभलो निधनाच्या।।
पुत्र जन्माच्या दिवशीच बंडोजीची झोपडी उडाली. त्यामुळे गावकऱ्यांनी बंडोजीला हिंमत देवून शोजाऱ्यापाजाऱ्यांनी श्रमदान करुन चार-आठ दिवसांत बंडोजीची झोपडी पूर्ववत उभी केली. झोपडी नीट होताच तानाबाईनी नातवाला घरी आणलं.
११ मे १९०९ ला बाळ बारा दिवसांचा झाला. बारव्या दिवशी बाळाचे नामकरण संस्कार करावयाचे ठरले. पण बारशाला काय करणार, या विचारात असतानाच आकोटचे श्रीहरीबुवा सरळ यावलीला बंडोजीच्या घरी आले. त्यावेळी प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यावलीलाच होते. अचानकपणे ते दोघेही एकाचवेळी अनाहुतपणे बंडोजीच्या घरी आले. गावच्या लोकांनी बारशाच्या सोहळ्यासाठी गढ्या तोरणांनी झोपडी सुशोभित केली होती. दारात मंगलवाद्ये वाजत होती. त्यावेळी हे दोघेही दाराजवळ आले. दोघांनाही एकदम आलेले पाहून लोकांना आश्चर्य वाटले. बंडोजींनी त्यांचे स्वागत केले. दोघेही म्हणतात - ‘मंजुळाबाई! आमच्या बाळाला बघू दे!’ असे म्हणून ते झोपडीत शिरले. मंजुळाबाई आपलं बाळ त्याच्या पायावर घालण्याच्या प्रयत्नात असतांनाच हरीबुवांनी बाळ मोठ्या घाईने आपल्या हातावर घेतलं व म्हणाले, ‘बाई! कोणाच्याही पायावर नोको ठुत जावू या लेकराले, याच्याच पायावर जमाना डोकं ठेविन’ आणि हरीबुवा त्या बालकाशी काही बोलू लागले. त्याच वेळी गुलाबराव महाराज म्हणाले ‘सवाष्णीनों! बाळाला पाळण्यात घाला व मंगल गाणी गा’ दोन दोन महात्मे तिथे असल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली’ त्यांची वाचाच कुंठित झाली. हरीबुवांनी स्वत:च बाळाला पाळ्यात घातले. संत गुलाबराव महाराजांनी बाळाच्या अंगावरुन हात फिरविला. सहज वाणीतून त्यांनी मंगलगीत गायलं. त्यांनी स्वयंस्फूर्त पाळणा गायला सुरुवात केली. पाळण्यानंतर त्या संत द्वयांनी ‘माणिक देव - माणिक देव’ असा उद्घोष केला आणि दोघांनीही पाळणा हलविला. झोके देवू लागले. हा अपूर्व नामकरण विधी डोळे भरुन पाहण्यासाठी शेकडो महिला पुरुष मिळेल त्या जागी अंगणात, रस्त्यावर उभे होते. तानाबाईच्या व बंडोजीच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहत होते. मंजूळा तर जणू प्रभू स्मरणातच निमग्न होती. ‘मंजुळा तुझा बाळा भाग्यवान आहे बाई!’ असा उच्चार करीतच शेजारणी घरी गेल्यात. महाराजांनी ‘माझी आत्मकथा’ मध्ये हा प्रसंग वर्णिला आहे. आकोट ग्रामीचे हरीबुवा सिध्दा देती आशिर्वाद तान्हपणी।। संत गुलाबराव माधान गावीचे । आशिर्वाद त्यांचे बालकाशी।।
- बाबा आवारे

Web Title: Police outposted three trucks outside the station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.