Satara: पाचगणीतील टेन्ट हाऊसवर पोलिसांचा छापा, बारबालांसह ३३ जणांवर कारवाई

By दीपक शिंदे | Published: February 19, 2024 03:23 PM2024-02-19T15:23:20+5:302024-02-19T15:23:43+5:30

पाचगणी : पाचगणी, ता. महाबळेश्वर येथे टेंट हाऊसमध्ये सुरू असणाऱ्या डान्सबारवर पाचगणी पोलिसांनी छापा टाकून १२ बारबालांसह डाॅक्टर, व्यापारी, ...

Police raided a tent house in Panchgani, action was taken against 36 people including Barbala | Satara: पाचगणीतील टेन्ट हाऊसवर पोलिसांचा छापा, बारबालांसह ३३ जणांवर कारवाई

Satara: पाचगणीतील टेन्ट हाऊसवर पोलिसांचा छापा, बारबालांसह ३३ जणांवर कारवाई

पाचगणी : पाचगणी, ता. महाबळेश्वर येथे टेंट हाऊसमध्ये सुरू असणाऱ्या डान्सबारवर पाचगणी पोलिसांनी छापा टाकून १२ बारबालांसह डाॅक्टर, व्यापारी, उद्योजक, विक्रेते अशा ३३ जणांना ताब्यात घेतले. यातील बहुतांश संशयित हे सोलापूर, पंढरपूर येथील असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई दि. १९ रोजी रात्री सव्वाबारा वाजता करण्यात आली.

पाचगणीपासून जवळच असलेल्या खिंगर येथे ‘टेंट हाऊस’ नावाचे हाॅटेल आहे. या हाॅटेलमध्ये डान्सबार सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. जी. पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिसांची दोन पथके तयार करून रात्री सव्वाबारा वाजता ‘टेंट हाऊस’वर छापा टाकला. त्यावेळी १२ बारबाला तोकड्या कपड्यात गिऱ्हाईकांसमोर उभ्या राहून बीभत्स हावभाव करून त्यांच्याशी लगट करत हाेत्या. तर काहीजण बारबालांसोबत नृत्य करत होते. पोलिस आल्याचे समजताच चार पुरुष तेथून पळून गेले.

पोलिसांनी हाॅटेल मालक डाॅ. विजय रघुनाथ दिघे यांच्यासह २१ पुरुष आणि १२ बारबालांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून महागडे मोबाईल, तसेच अलिशान गाड्या जप्त केल्या. या सर्वांवर विविध कलमांन्वये पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘हे’ होते बारबालांचे गिऱ्हाईक..

भैरवनाथ चंद्रकांत चवरे (वय ३७, रा. पेनुर, ता. मोहळ, जि. सोलापूर), विजय रघुनाथ दिघे (वय ४६, रा. खिंगर, ता. महाबळेश्वर, मूळ रा. आंबेघर तर्फे कुडाळ, ता. जावळी), गिरीष एकनाथ देवकते (वय ३४, रा. धानोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), विकास बाबासाहेब चव्हाण (वय २५, रा. मोहोळ, जि. सोलापूर), सचिन सुधाकर वावकर (वय ४६, रा. धानोरी रोड, पुणे), सूरज दिगंबर कुंभार (वय २२, रा. वाकीशिवनी, ता. सांगोला, जि. सोलापूर), बाबासाहेब बाबुराव सलगर (वय ४८, रा. सादेपूर पो. निंबरगी, ता. दक्षिण सोलापूर), गणेश शिवाजी सरगर (वय २२, रा. उदयनवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर), रवी भैरू खनट (वय ३३, रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर), 

सदानंद विठ्ठल देवकाते (वय ३८, रा. सादेपूर, जि. सोलापूर), प्रदीप बापू खांडेकर (वय ३२, रा. शेंडगेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), विजय श्रीमंत नागने (वय ३८, रा. कोंढरकी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), कैलास रामचंद्र गुरवे (वय ३७, रा. सावळेश्वर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), आण्णा नाना पडळकर (वय ५५, रा. आटपाडी, जि. सांगली), संजय वसंत सोनवणे (वय ४६, रा. पाथर्डी फाटा, नाशिक), गणेश हणमंत कर्नावर (वय ३२, रा. भोईरे, ता. मोहोळ, जि. सोलापूर), नंदकुमार श्रीरंग शिंदे (वय ४८, रा. मसली चाैक, ता. मोहोळ, जि. सोलापूर), महेश दत्तात्रय खरात (वय २६), गणेश नामदेव पुजारी (वय ३३, रा. सोनके सोलापूर, ता. पंढरपूर) या २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Police raided a tent house in Panchgani, action was taken against 36 people including Barbala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.