विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी -देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:57+5:302021-05-12T04:40:57+5:30

सातारा : शासनाने कडक निर्बंध लावूनही काही नागरिक अनावश्यकपणे घराबाहेर फिरत आहेत, अशा नागरिकांवर पोलीस विभागाने कारवाई करावी, अशा ...

Police should take action against those who walk without any reason - Desai | विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी -देसाई

विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी -देसाई

Next

सातारा : शासनाने कडक निर्बंध लावूनही काही नागरिक अनावश्यकपणे घराबाहेर फिरत आहेत, अशा नागरिकांवर पोलीस विभागाने कारवाई करावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा देसाई यांनी घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध नाक्यांवर पोलीस विभागामार्फत तपासणी केली जाते. या तपासणी कामास नगर परिषदांनी मदत करावी, अशा सूचना करून गृह राज्यमंत्री देसाई पुढे म्हणाले, जे नागरिक अनावश्यकपणे रस्त्यांवर फिरत आहेत, अशांवर कारवाई करा. तसेच कडक निर्बंध असूनही काही ठिकाणी गर्दी दिसत आहे, ही गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

Web Title: Police should take action against those who walk without any reason - Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.