पोलीस ठाणे बनले अभ्यास केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:43 PM2019-02-19T22:43:32+5:302019-02-19T22:43:39+5:30

स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पोलीस ठाण्याची पायरी कधी चढावी लागू नये, असे प्रत्येकाला वाटत असते. ...

Police stations became a center of practice | पोलीस ठाणे बनले अभ्यास केंद्र

पोलीस ठाणे बनले अभ्यास केंद्र

Next

स्वप्नील शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पोलीस ठाण्याची पायरी कधी चढावी लागू नये, असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र, त्याला सातारा विभागीय पोलीस कार्यालय अपवाद ठरू पाहत आहे. कारण पोलिसांनी अधिकारी घडविण्यासाठी चक्क कार्यालयातच ग्रंथालय सुरू केले असून, ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांना मार्गदर्शक ठरत आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे राज्यातील बहुदा पहिलेच कार्यालय असावे.
पोलीस हा जनतेचा मित्र असल्याचे सांगितले जाते. मात्र, सामान्य लोक आणि पोलीस यांच्यामध्ये एक अदृश्य अंतर असते. त्याला कारण त्यांच्या अंगावर असलेली खाकी वर्दी. या वर्दीच्या आतला माणूस नेहमीच सामान्यांसाठी गूढ असतो. त्यामुळे पोलीस ठाण्यात जायचे म्हटले की, अनेकांच्या मनात धडकी भरते. याच भीतीपोटी पोलीस ठाण्याची पायरी चढून आतमध्ये जाण्याचा विचारही केला जात नाही.
पोलीस ठाण्यातील खेकसणारा पोलीस, तुरूंग, गुन्हेगार अशा नकारात्मक गोष्टींमुळे सामान्य माणूस पोलीस ठाण्यापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांची हीच प्रतिमा बदलण्यासाठी सातारा पोलीस दलाने कार्यालयात ग्रंथालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अधिकाºयांना भेटणाºया प्रत्येक अभ्यंगताने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देण्यापेक्षा शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलिसांच्या आवाहनास सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोन महिन्यांत तब्बल ५०० पुस्तके जमा केली. जमा झालेल्या या पुस्तकांचे सातारा विभागीय पोलीस कार्यालयात ग्रंथालय उभारण्यात आले. या ग्रंथालयात आज स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक युवक-युवती येत असून, आवश्यक पुस्तके घेऊन त्यांचा अभ्यास करीत आहेत. तसेच त्यांना मार्गदर्शनही अधिकारी करीत आहेत
पुस्तके घरी घेऊन जाता येणार
पोलीस कार्यालयातील ग्रंथालयामध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षेस बसू इच्छिणाºया विद्यार्थ्यांची नोंद करण्यात येते. त्याला आवश्यक असणारे पुस्तक त्याने स्वत: निवडून अभ्यासाला बसावे, अथवा घरी घेऊन जावे. हे पुस्तक केवळ पाच दिवस वाचनासाठी घरी घेऊन जाता येईल. मात्र, पाच दिवसानंतर त्यांनी हे ग्रंथालयामध्ये जमा करावे. विद्यार्थ्यांना लागणारे पुस्तक ग्रंथालयात नसेल तर त्यांनी तसे सुचविल्यास ते पुस्तक उपलब्ध करून दिले जाते.

Web Title: Police stations became a center of practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.