म्हासुर्णेत पोलिसांकडून सहा दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:12+5:302021-05-25T04:43:12+5:30
पुसेसावळी : राज्यात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ...
पुसेसावळी : राज्यात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात २५ ते १ जूनपर्यंत लॉकडाऊनचे कडक निर्बंध घातले आहेत.
मायणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी म्हासुर्णेत दक्षता कमिटीची बैठक घेतली. यावेळी दक्षता कमिटीस गावातील दुकाने, विनाकारण फिरणारे लोक तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेले कडक निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करण्यास दक्षता कमिटीला सूचना दिल्या. जो नियम मोडणार त्यांच्यावर कडक कारवाई करून दंड वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बैठकीसाठी गावात आल्यानंतर गावातील दुकाने उघडी दिसताक्षणी दुकानदारांवर वर नियमाचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई केली. एकाच वेळी सहा दुकानांवर कारवाई करण्यात आहे. लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदाच मोठ्या कारवाईने म्हासुर्णेत दुकानदार व ग्रामस्थ नियमांचे पालन करतील, अशी आशा आहे.
या बैठकीस सरपंच सचिन माने, उपसरपंच विठ्ठल माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, सिकंदर मुल्ला, सुहास माने, आबा यमगर, संगीता गुरव, तृप्ती थोरात, अजित माने, विठ्ठल माने, पंढरीनाथ तुपे, प्रवीण चव्हाण, चंद्रकांत यमगर, पोलीस अधिकारी व म्हासुर्णे ग्रामस्थ उपस्थित होते.