धूनटाक फेस्टीवलवर पोलिसांकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 10:28 AM2020-03-14T10:28:48+5:302020-03-14T10:29:37+5:30
मालक रितेश मोरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. हवालदार राहूल खाडे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सातारा : येथील गोडोलीमधील ग्रीन सँड या हॉटेलमध्ये धूनटाक फेस्टीवलचे आयोजन करून बेकायदा डीजे लावून गोंधळ घालणाºया काही युवकांवर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी डीजे, एलईडी आदि साहित्य जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, गोडोली येथे ग्रीन सँड या नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये शुक्रवारी धूनटाक या फेस्टीवलचे आयोजन केले होते. मोठ्या आवाजात डीजे लावून गोंधळ घातला जात होता. या प्रकाराची माहिती सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाºयांसह तेथे धाव घेतली. नृत्य करण्यात दंग असणाºया काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर काहीजण तेथून पसार झाले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून डीजेसह विविध प्रकारचे साहित्य जप्त केले आहे.
ऐन रंगपंचमीच्या धामधुमीतच पोलिसांनी ही कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शुभम चौकवाले, सुरज जांभळे, ओंकार मोहिते, अमोल गोखले (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांच्यासह डीजे मालक रजनी नागे आणि हॉटेल मालक रितेश मोरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. हवालदार राहूल खाडे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.