हक्काच्या सुट्यांसाठी पोलीस प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:38 PM2019-01-29T23:38:40+5:302019-01-29T23:39:06+5:30

स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ असणारा पोलीस हा नेहमीच २४ तास आॅन ड्यूटीवर असतो. ...

Police waiting for claims for the holidays | हक्काच्या सुट्यांसाठी पोलीस प्रतीक्षेत

हक्काच्या सुट्यांसाठी पोलीस प्रतीक्षेत

Next

स्वप्नील शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ असणारा पोलीस हा नेहमीच २४ तास आॅन ड्यूटीवर असतो. सण-उत्सवातही बंदोबस्तामध्ये व्यस्त असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी हक्कांच्या सुट्यांसाठी प्रतीक्षेत असतात. त्यांना साप्ताहिक सुट्या व हक्कांच्या रजेसाठी वरिष्ठांकडे हाजी-हाजी करावी लागत असल्याने त्याचा परिमाण कामकाजावर होत असतो.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी पोलीस खात्यावर असते. खून, हाणामारी, अत्याचार आदी गुन्ह्यांचा तपास करून आरोपींचा शोध घेणे, सण, उत्सव, आंदोलन, निवडणुकीचा बंदोबस्त राखणे आदी कामे करावी लागत असतात. त्यामुळे त्यांना नेहमीच २४ तास आॅन ड्यूटी राहावे लागत असते. सण, यात्रा, उत्सवाच्या काळात तर पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांनाही वेळ देता येत नाही.
पोलिसांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सोयी-सुविधा मिळत असतात. त्यामध्ये साप्ताहिक सुटी, हक्काची रजा व किरकोळ रजा आदींचा समावेश आहे. इतर शासकीय कर्मचाºयांना प्रत्येक महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार प्रमाणे २४, साप्ताहिक ५२, सार्वजनिक २५ अशा एकूण १०१ सुट्या असतात. त्याचबरोबर हक्क व किरकोळ अशा एकूण १५० सुट्या मिळत असतात. परंतु अनेक पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची कमतरता, उत्सव, यात्रा आणि निवडणुकीच्या कारणांमुळे पोलिसांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द होत असतात. तर वैयक्तिक कारणांसाठी किरकोळ व हक्काच्या रजेसाठी वरिष्ठांकडे हाजी-हाजी करावी लागते.
अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वरिष्ठ मेहरबानी केल्यासारखे रजा मंजूर करतात. तर काहींच्या रद्द करून त्यांना मानसिक त्रास देत असतात. अनेक कर्मचाºयांना हक्काच्या सुट्या व रजा न मिळाल्याने पुढच्या वर्षी त्या रद्द होत असतात. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असतो.
रजेसाठी आजारपणाचे कारण
साप्ताहिक सुटी, हक्काची रजा व किरकोळ रजा मिळत नसल्याने अनेक कर्मचाºयांचा मानसिक त्रास वाढतो. त्यामुळे ते वरिष्ठांकडून रजा मिळत नसल्याने आजारपणामुळे थेट रुग्णालयात दाखल असल्याचे दाखवून रजेवर जात असतात.
साप्ताहिक सुटीचा भत्ता
यात्रा, सण-उत्सव, निवडणुकीच्या कारणांमुळे अनेक वेळा कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द होत असतात. त्या दिवशी त्यांना वेगळा भत्ता मिळतो. मात्र, पोलिसांना भत्त्यापेक्षा हक्काची सुटी व रजा मिळण्याची अपेक्षा असते.

Web Title: Police waiting for claims for the holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.