पोलिसांचा वॉच; वचकही हवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:45+5:302021-05-16T04:38:45+5:30
कोरोनाचं संकट येऊन आता एक वर्ष उलटून गेलं आहे. या संकटानं सर्वांनाच ग्रासलं आहे. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू ...
कोरोनाचं संकट येऊन आता एक वर्ष उलटून गेलं आहे. या संकटानं सर्वांनाच ग्रासलं आहे. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू असून दररोज रुग्णवाढीचे मोठमोठे आकडे समोर येत आहेत. सातारा जिल्ह्यात तर बाधित दीड लाखाजवळ पोहोचलेत. त्यामुळे कोरोना संकट रोखण्याची जबाबदारी नागरिकांचीच अधिक आहे. त्यासाठी शासन नियमांचे पालन आवश्यकच आहे. प्रशासन आपल्यासाठी राबत असताना त्यांना मदतीची भूमिका घ्यायलाच हवी. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचीही भूमिका महत्त्वाची आहे.
कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. पण, अनेकवेळा पोलिसांनाच कारवाई करताना अनेकांचे मोबाईल कॉल येतात. अशावेळी कायदा महत्त्वाचा मानून चूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचीच गरज आहे. तरच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर वचक बसेल. तसेच जिल्ह्याच्या सीमेवरही कडक बंदोबस्त असायला हवा. प्रवासाची परवानगी असेल तरच पुढे सोडण्यात यावे. कारण, जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात येणारे हे कोरोना वाहक ठरु शकतात. त्यामुळे अशा लोकांवर वॉच असायलाच हवा. तरच कोरोनाला अटकाव बसण्यास मदत होईल.
चौकट :
... तरच इतरांवर वचक !
कोरोनामुळे निर्बंध असल्याने जिल्ह्यातील पोलीस दक्ष आहेत. पण, अनेकवेळा कारवाई दरम्यान पोलिसांकडून काहींना कोणाच्या तरी मोबाईल कॉलमुळे सोडून द्यावे लागते. अशावेळी पोलिसांनी कायद्यापुढे सर्व समानच हे तत्त्व अंगिकारुन कारवाई करण्याची गरज आहे. तरच इतरांवरही वचक बसण्यास मदत होईल.
- नितीन काळेल
......................................................