उपद्रवी विद्यार्थ्यांवर पोलिसांचा ‘वॉच’
By admin | Published: September 5, 2014 09:27 PM2014-09-05T21:27:39+5:302014-09-05T23:22:21+5:30
पोलिस उपअधिक्षक मितेश घट्टे यांनी घेतला़ अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवून निर्णय
कऱ्हाड : येथील शहर व परिसरातील शाळा तसेच महाविद्यालयातील उपद्रवी विद्यार्थ्यांचे स्वतंत्र रेकॉर्ड तयार करून, त्यांच्यावर यापुढे वॉच ठेवण्याचा निर्णय पोलिस उपअधिक्षक मितेश घट्टे यांनी घेतला़ गत आठवड्यात झालेल्या एका अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची तातडीची बैठक बोलवून हा निर्णय घेण्यात आला़ घट्टे म्हणाले, पोलिस प्रशासन, शाळा तसेच महाविद्यालयांचे प्रशासन यांच्यामध्ये यापुढे सातत्याने समन्वय रहावा यासाठी एक समिती तयार करण्याचे प्रयत्न आहेत़ तसेच महाविद्यालयात मोटरसायकल घेवून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे परवाने तपासून त्यांना यापुढे सिम्बॉलीक स्टिकर दिले जाईल़ परवाना नसणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल़ महाविद्यालयांनी उपद्रवी विद्यार्थ्यांचे एक रजिस्टर तयार करुन, त्यांची एक यादी पोलिसांना द्यावी़ त्यांच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करेल़ तसेच पालकांनीही आपल्या पाल्याबाबत सजग राहण्याचे अवाहन त्यांनी केले़गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालय परिसरात वातावरण चांगलेच तंग बनले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर मुलांमध्य ेहोणाऱ्या वादावादीचे प्रसंग पुढे भांडणापर्यंत जावू नयेत यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहे. यामुळे महाविद्यालय परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी़ आऱ पाटील, पोलिस निरीक्षक शहाजी निकम, उंब्रजचे निरीक्षक एम़ के़ पाटील यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
काही दिवसांपासून महाविद्यालय परिसरात वातावरण चांगलेच तंग बनले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर मुलांमध्य ेहोणाऱ्या वादावादीचे प्रसंग पुढे भांडणापर्यंत जावू नयेत यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहे. यामुळे महाविद्यालय परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.