रात्री वाहनांवर पडणाऱ्या दगडांमुळे पोलीस कामाला-शाहूपुरीतील प्रकार : वाहनधारक तणावाखाली; अज्ञातांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:38 PM2018-06-27T22:38:00+5:302018-06-27T22:38:43+5:30

येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे. रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली

 Police work due to the stones falling on vehicles in the night; Type of carrier: Under vehicle holder tension; Discovery of the Arabs | रात्री वाहनांवर पडणाऱ्या दगडांमुळे पोलीस कामाला-शाहूपुरीतील प्रकार : वाहनधारक तणावाखाली; अज्ञातांचा शोध

रात्री वाहनांवर पडणाऱ्या दगडांमुळे पोलीस कामाला-शाहूपुरीतील प्रकार : वाहनधारक तणावाखाली; अज्ञातांचा शोध

Next

सातारा : येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे. रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली आहेत.शहरालगतच्या शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेकांनी या परिसरातच बंगले बांधले आहेत. कॉलनींतील रस्तेही प्रशस्त असल्याने लोक रात्रीच्यावेळी रस्त्याकडेला अथवा मोकळ्या जागांवर आपली वाहने पार्क करतात.

वाहनांच्या काचा फुटत असल्याने जयविजय सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी, गडकर आळी, सर्वोदय नगर, मोळाचा ओढा, सैदापूर फाटा या परिसरातील वाहनधारक प्रचंड तणावाखाली आहेत.काही दिवसांपासून मात्र अनेक कॉलन्यांमध्ये वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही समाजकंटकांकडून सुरू आहे. मध्यरात्री स्थानिक रहिवाशी झोपी गेल्यानंतर काहीजण वाहनांवर दगड टाकत आहेत. अनेक वाहनांच्या काचा फुटत आहेत. अनेक जणांनी आपल्या स्वत:च्या जागेत पार्क केलेल्या वाहनांवरही दगड टाकले जात आहेत.

वाहनांच्या काचा फुटून हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याने वाहनधारकांनी होणाºया खर्चाची धास्ती घेतली आहे. वाहनधारकांना वेठीस धरणाºया समाजकंटकांवर कारवाई करावी, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
 

रात्रीच्यावेळी कुठलेही दुचाकी अथवा चारचाकी वाहन हे एकतर बंगल्याच्या पार्किंगमध्ये अथवा रस्त्याच्या कडेला असणाºया मोकळ्या जागांमध्ये लावले जाते. सर्व लोक झोपलेले असताना वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार होत आहे. याबाबत वेळीच दक्षता घेण्यासाठी मानस मित्र समूहाने रात्रीची गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे.
- नीलेश धनावडे, अध्यक्ष मानस मित्र समूह

Web Title:  Police work due to the stones falling on vehicles in the night; Type of carrier: Under vehicle holder tension; Discovery of the Arabs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.