९९ गावांमध्ये पोलीस पाटील पद रिक्त

By Admin | Published: September 18, 2015 10:35 PM2015-09-18T22:35:51+5:302015-09-18T23:13:57+5:30

फलटण तालुका : २६ ठिकाणी कार्यरत; भरतीसाठी आरक्षण निश्चित

Police's vacant posts in 99 villages | ९९ गावांमध्ये पोलीस पाटील पद रिक्त

९९ गावांमध्ये पोलीस पाटील पद रिक्त

googlenewsNext

फलटण : ‘फलटण तालुक्यातील ९९ गावांमधील पोलीस पाटील पदे रिक्त असून, केवळ २६ गावांत पोलीस पाटील कार्यरत आहेत. ९९ गावांमध्ये पोलीस पाटील नियुक्ती करण्यासाठी गुरुवारी संबंधित गावांतील या पदाची आरक्षणे निश्चित करण्यात आली. त्या गावातील पोलीस पाटील पद नियुक्तीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार आहे,’ अशी माहिती प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणानुसार ३८ गावांतील पोलीस पाटील पदे सर्वसाधारण गटासाठी खुली राहिली आहेत. १६ गावांतील पदे सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित आहेत. १३ गावांतील पदे इतर मागासवर्गीयांसाठी तर पाच गावांमधील पदे इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तीन गावांमधील पदे अनुसूचित जाती महिलांसाठी, तीन गावांमधील पदे अनुसूचित जमाती महिलांसाठी, सात गावांमधील पदे अनुसूचित जातीसाठी, सहा गावांमधील पदे अनुसूचित जमातीसाठी, विमुक्त जाती, अ. भ. ज. ब. (महिला), भ. ज. ड. (महिला), भ.ज.ड. वि. मा. प्र., वि. मा. प्र. (महिला) यासाठी प्रत्येकी एका गावातील भ. ज. ब. साठी दोन गावांमधील पदांची आरक्षणे निश्चित करण्यात आल्याचे प्रांताधिकारी जाधव यांनी सांगितले आहे.खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या गावामध्ये हिंगणगाव, तिरकवाडी, आरडगाव, सोनवडी बुद्रुक, पिंपळवाडी, सरडे, ढवळ, कुरवली खुर्द, कुरवली बुद्रुक, तांबवे, वाघोशी, रावडी बुद्रुक, वडले, फडतरवाडी, ढवळेवाडी, पिंप्रद, ठाकुरकी, विडणी, भाडळी खुर्द, तडवळे, सुरवडी, गिरवी, मिरढे, झिरपवाडी, चांभारवाडी, चौधरवाडी, वाजेगाव, विठ्ठलवाडी, चव्हाणवाडी, ठाकळवाडे, खराडेवाडी, फरांदवाडी, हनुमंतवाडी, ढवळेवाडी (आसू), मिऱ्याचीवाडी (दालवडी) व होळ आदींचा समावेश आहे.खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या गावांमध्ये शेरेचीवाडी (हिंगणगाव), मुळीकवाडी, सासवड, बिबी, शेरेचीवाडी (ढवळ), आदर्की खुर्द, माळेवाडी, (कुसूर), धुमाळवाडी, नाईकबोमवाडी, शेरे शिंदेवाडी, सोनवडी खुर्द, डोंबाळवाडी, बोडकेवाडी, शिंदेनगर, भाडळी बुदु्रक, मठाचीवाडी या गावांचा समावेश आहे.इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या गावांमध्ये वाखरी, पवारवाडी, गोखळी, राजुरी, दत्तनगर, नांदल, वडगाव, मलवडी, सांगवी, धुळदेव, विंचुर्णी, मिरगाव आणि काशीदवाडीचा समावेश आहे. इतर मागास प्रवर्गासाठी भवानीनगर, भिलकटी, टाकुबाईचीवाडी, खडकी आणि सासकल या गावांचा समावेश आहे. अनुसूचित जाती महिलासाठी राखीव गावामध्ये वडजल, जाधववाडी (आसू) आणि पिराचीवाडी, अनुसूचित महिलांसाठी राखीव असलेल्या गावांमध्ये आंदरुड, आदर्की बुद्रुक व राजाळे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गावांमध्ये घाडगेवाडी, वेळोशी, शिंदेवाडी, कोरेगाव, कुसूर, कोऱ्हाळे, व मुरुम. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गावामध्ये बरड, अलगुडेवाडी, साठे, उपळवे, घाडगेमळा व ताथवडा या गावांचा समावेश आहे.वि. जा. (भ) काळज, भ. ज. (ब) (म्हिला) कोळकी, भ. ज. (ब) तरडगाव, मुंजवडी, भ.ज. (ड) (महिला) खुंटे, भ. ज. (ड) कांबळेश्वर. वि. मा. प्र. वाठार निंबाळकर, वि. मा. प्र. (महिला) निंबळक या गावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

कोतवालांची पदे भरणार...फलटण तालुक्यातील सहा सजातील कोतवालांची रिक्त पदे जात प्रवर्गानुसार भरण्यात येणार आहेत. कोतवाल म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या संबंधित गावातील व्यक्तीने दि. २१ पर्यंत तहसील कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन तहसीलदार विवेक जाधव यांनी केले आहे. कोतवालपद भरण्यात येणाऱ्या गावांचे नाव व तेथील जाती प्रवर्गांचे आरक्षण पुढीलप्रमाणे पवारवाडी व वडले (अनुसूचित जाती), मुंजवडी (इतरमागास), कापडगाव (खुल्या प्रवर्गातील महिला) सांगवी व फलटण (खुला प्रवर्ग). या पदासाठी बारावी उत्तीर्ण, एम. एस. सी.आय.टी संगणक अर्हता प्रमाणपत्र आवश्यक आहे. १८ ते ४० वर्षे वयोमर्यादा, राखीव जागाबाबत सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच गावचे भौगोलिक क्षेत्राचे राजकीय व सामाजिक परिस्थितीचे ज्ञान आवश्यक आहे.

Web Title: Police's vacant posts in 99 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.