शासकीय इमारतीतील खासगी कोरोना सेंटरमध्ये राजकीय हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:50 AM2021-04-30T04:50:24+5:302021-04-30T04:50:24+5:30

कोरेगाव : कोरेगावमधील शासकीय इमारतीत खासगी कोरोना सेंटर सुरु केले आहे. तेथे राजकीय पक्ष पाहून रुग्णांना प्रवेश दिला जातो ...

Political interference in a private corona center in a government building | शासकीय इमारतीतील खासगी कोरोना सेंटरमध्ये राजकीय हस्तक्षेप

शासकीय इमारतीतील खासगी कोरोना सेंटरमध्ये राजकीय हस्तक्षेप

Next

कोरेगाव : कोरेगावमधील शासकीय इमारतीत खासगी कोरोना सेंटर सुरु केले आहे.

तेथे राजकीय पक्ष पाहून रुग्णांना प्रवेश दिला जातो अथवा नाकारला जातो. हे बरोबर नाही. प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता कारवाई करावी, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे,

उपसभापती संजय साळुंखे व जितेंद्र जगदाळे यांनी केली आहे.

कोरेगाव पंचायत समितीत गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जगदाळे व साळुंखे म्हणाले, ‘कुमठे येथील अतिगंभीर रुग्णांना कोरोना सेंटरमध्ये दाखल करुन घेताना

राजकीय पक्ष पाहिला गेला. जाब विचारायला गेल्यावर एका रुग्णाला तत्काळ

दाखल करुन घेतले तर दुसऱ्याला पिटाळून लावले. ही बाब गंभीर आहे, या कोरोना सेंटरमधील राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप थांबवावा. त्यांना प्रवेश नाकारला जावा. आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली कामकाज चालवा, रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण त्यांच्यामार्फतच करावे. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी ज्योती पाटील व उपजिल्हा

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे यांच्याशी बोलणे झाले आहे,

त्यांनी असे प्रकार पुन्हा घडू नयेत, याची दक्षता घेतो, असे सांगितले

आहे. मात्र तेथे राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नेमके काय करतात, हे समजत नाही. एकाच पक्षाचा अंमल ठेवून आरोग्य यंत्रणा वेठीस धरली

जात आहे. प्रशासन बघ्याची भूमिका घेते, नेमका कोणाचा दबाव आहे, हे समजले

पाहिजे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे, असेही जगदाळे व साळुंखे यांनी

स्पष्ट केले.

चौकट :

असे पुन्हा घडणार नाही

कोरोना सेंटरमध्ये घडलेल्या ‘त्या’ प्रकाराची माहिती सभापतींनी दिली

आहे. त्याची खातरजमा केली जाईल, असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, याबाबत

संबंधितांना सूचना दिल्या जातील. राजकीय भूमिका बाजूला ठेवून सर्वांनी

प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी ज्योती पाटील

यांनी केले.

चौकट :

शासनाच्यावतीने माझ्याकडेच जबाबदारी : करपे

कोविड सेंटरवर सुपरव्हिजन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्याकडेच दिली आहे. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत

काही तक्रारी असतील, तर त्यामध्ये लक्ष घालू, पुन्हा पुन्हा असे प्रकार

होणार नाहीत, याची सर्वतोपरी दक्षता घेऊ, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय

अधीक्षक डॉ. युवराज करपे यांनी दिली.

Web Title: Political interference in a private corona center in a government building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.