विधान परिषदेसाठी आज मतदान

By admin | Published: November 18, 2016 11:04 PM2016-11-18T23:04:17+5:302016-11-18T23:04:17+5:30

राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे हाय अलर्ट : ३०४ मतदार करणार मतदान

Poll for the Legislative Council today | विधान परिषदेसाठी आज मतदान

विधान परिषदेसाठी आज मतदान

Next

सातारा : विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शनिवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये चार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीतर्फे शेखर गोरे तर काँग्रेसतर्फे मोहनराव कदम निवडणुकीसाठी उभे असल्याने दोन्ही पक्षांनी जिल्ह्यात हाय अलर्ट ठेवला आहे.
वाई तहसील कार्यालय, वाई, महाबळेश्वर, पाचगणी पालिका व लोणंद नगरपंचायतींचे नगराध्यक्ष व सदस्य मतदान करतील. वाई पालिकेचे २० इतके मतदान आहे. महाबळेश्वर पालिकेचे ११ इतके मतदान आहे. पाचगणी पालिकेचे १७ तर नगरपंचायत लोणंद येथे १८ मतदार आहेत. या एकूण ६६ मतदारांना वाई तहसील कार्यालयात मतदान करता येईल. फलटण तहसील कार्यालयात फलटण, म्हसवड या पालिकांच्या सदस्यांना मतदान करता येईल. फलटणचे २८ नगरसेवक, म्हसवडचे १९ नगरसेवक असे एकूण ४७ मतदार मतदान करणार आहेत.
सातारा तहसील कार्यालयात जिल्हा परिषदचे अध्यक्ष व सदस्य, पंचायत समिती सभापती असे एकूण ७८ मतदार मतदान करणार आहेत. सातारा नगरपालिकेचे ४३ सदस्य, रहिमतपूर पालिकेचे १९ नगरसेवक असे एकूण १४० मतदार सातारा तहसील कार्यालयात येऊन मतदान करतील. कऱ्हाड तहसील कार्यालयात कऱ्हाड पालिकेचे ३२ सदस्य, मलकापूर नगरपंचायतीचे १९ सदस्य असे एकूण ५१ मतदार मतदान करतील.
निवडणुकीसाठी मतदान शनिवार, दि. १९ रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चारवाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी महसूल सांस्कृतिक भवन, सर्किट हाउस शेजारी, माधवनगर रोड, सांगली येथे मंगळवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता सुरू होईल, अशीही निवडणूक निर्णय अधिकारी, सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Poll for the Legislative Council today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.