सातारा जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 04:36 PM2022-07-01T16:36:25+5:302022-07-01T16:36:40+5:30

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज १२ ते १९ जुलैदरम्यान सादर करता येतील.

Polling for 10 gram panchayats in Satara district will be held on August 4 | सातारा जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार

सातारा जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यातील कऱ्हाड तालुका ९ आणि फलटण तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी ४ ऑगस्टला मतदान होणार आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

कऱ्हाड तालुक्यातील उत्तर कोपर्डे, आदर्शनगर, उत्तर तांबवे, कोयना वसाहत, पश्चिम उंब्रज, बेलवाडी, शितळवाडी, नाणेगाव बुद्रुक आदी गावांची, तसेच फलटणमधील परहर बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज १२ ते १९ जुलैदरम्यान सादर करता येतील. अर्जांची छाननी २० जुलै रोजी, तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत २२ जुलैला दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. याचदिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल, तसेच उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे, तर ५ ऑगस्टला मतमोजणी प्रक्रिया पार पाडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Web Title: Polling for 10 gram panchayats in Satara district will be held on August 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.